आषाढी आणि मन
आली आषाढी आषाढी मन पंढरी पंढरी
पाया बांधिला जोखड देवा कशी करू वारी
एकादशीचे दिवशी भक्त विठ्ठलाचे पायी
डोकं ठेविता चरणीं मन तन शांत होई
आलो तुझ्या दर्शनाला देवा भरून पावलो
वैकुंठ मिळाला देवा धन्य धन्य झालो
माऊली माऊली तुची आम्हा सर्वकाही
पांडुरंगा तुझ्या विना त्राता दुजा कोणी नाही
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home