Tuesday, 8 February 2022

विदेशी बांडगुळांवर बहिष्कार घाला

भारताच्या सार्वभौमत्वाचा अपमान करणाऱ्या विदेशी बांडगुळांवर बहिष्कार घाला:

काही दिवसांपूर्वी हा विक्षिप्त उद्दामपणा  विदेशी परंतु भारतातील व्यवसायावर उन्मत्त झालेल्या ह्युंदाई, के एफ सी वगैरे सारख्या कंपन्यांनी पाकिस्तानात केला आहे. पाकड्यांना खुश करण्यासाठी या अधमांनी तेथे काश्मीर डे ला पूरक अशा जाहिराती प्रसिद्ध केल्यात. अभिमानाने सांगावेसे वाटते की आपल्या देशाविषयी जाज्वल्य अभिमान बाळगणारा आजचा तरुण वर्ग पेटून उठला आणि त्यांनी सोशल मीडिया वर ह्या कंपन्यांच्या विरुद्ध रान उठवले आणि त्यांना सळो की पळो करून सोडले आहे. "बॉयकॉट ह्युंदाई" हा ट्रेंड इतका जोरात चालला आहे की कंपनीच्या तंबूत घबराट पसरली आहे. हा तरुण वर्ग येथवरच थांबला नाही तर त्यांनी बुकींग रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. हीच खरी राष्ट्रीय भावना असते. 

चला आपणही आपल्या परीने प्रयत्न करुया आणि ह्या मस्तवाल कंपन्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शक्य ते सहकार्य करुया.

कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home