वक्तृत्व
वक्तृत्वा" करिता दातृत्व, मातृत्व आणि भ्रातृत्व हे तीन भाव अंतर्भूत असणे आवश्यक आहे आणि तितकेच महत्त्वाचे आहे. ज्याच्या अंगी समाजाला काही देण्याची भावना असते तो त्या दातृत्वापोटी विचारांचं दालन उघडून दान करीत असतो. ज्याचे अंगी मातृत्व असते तो विचारांचं सृजन करतो आणि भ्रातृत्वाची ऊर्मी ज्यांचं जीवन व्यापून असते तेच अनेक विचारांची योग्य सांगड घालून वक्तव्य करण्यात सफल होतात. पोपटपंची करणारे बहू असू देत पण त्यांच्या वक्तृत्वाची छाप पडत नाही. व्यासंगी विद्वान होऊ शकतो परंतु सृजनशील हा खऱ्याअर्थाने विचार प्रवर्तक असतो.
संत तुकाराम किंवा समर्थ रामदास हे अजोड कवि समाजासाठी विचार प्रवर्तक ठरले ह्यामागे त्यांच्या वैचारिक पातळीची उत्तुंगता ध्यानी येते.
जगातील अशा सर्व सृजनात्मक कार्य करणाऱ्या भाषाविदांना आणि त्याद्वारे सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या विभूतिंना सादर नमन 🙏
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home