Saturday, 5 February 2022

लता दीदी:अखेरचा श्वास


हो जयाच्या संगतीने श्वास आम्ही साधला
आज त्या श्वासासवे तो सूर की हो निमाला
ती प्रभातीची भुपाळी अन देव दर्शन ते दिसे
कां म्हणोनि लुप्त व्हावे एका क्षणी हो ते असे
धुंद ते तारुण्य अमुचे पोसले तव गीतांसवे
स्वर तो आता नसे फक्त उरली आसवे
प्रेम,करुणा,विररस अन् देवभक्ती त्वा गायिली
होय गे लताबाई ती देशभक्ती ही त्वा दिली
स्वरांकित ती तव गायकी विलसली सृष्टी की जणू
मज पोरके तू करुनी गेली ह्या परी मी काय म्हणू
एकची मागणे हे ईश्वरा तुज मागतो मी ह्या क्षणी
दे तिला सहवास स्वर्गी, राहू दे तव चरणी 🙏🙏
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home