आयुष्याच्या निसरड्या वाटा
आयुष्याच्या निसरड्या वाटा,
त्यात पायात रुतला काटा
धडपडत,पडत झडत,
कुथत रडत,भांडत सांडत
वेचत चाललोय
वाट्याला आलेला प्रत्येक वाटा
श्र्वासांची बेरीज की वजाबाकी
ह्या चिंतेस देवून फाटा
आठवांचे थवे
नि:शब्द मनांत रूंजी घालतात उतारावर आंब्याच्या वनातली कोकिळा आतां
रूदन करते
कॉंक्रीटच्या जंगलातील ऊंच ऊंच पठारावर पहाटेच्या सूर्याचे ते ऊगवणे
आता टिव्हीत सामावले
मंदीरातील घंटानादाचे कंत्राट
एफ् एम् ने कमावले
पहाटे
तुका,ज्ञाना, सोपान,मुक्ता, आणि असे संत कानाकानात भेटायचे,
हरवून जायची मनींची भ्रांत
अन्न, वस्त्र, निवारा
आणि ह्यापुढे एक तो ईश्वर
ऊद्याच्या मृगजळामागे
आज फिरतो मी जरी ते नश्वर
© कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home