Sunday, 13 February 2022

पुलवामा शहीदी दिवस

शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले वतन पर मिटने वालों का बाकी यही निशाॅं होगा
सहस्त्र वर्षांचा इतिहास सांगतो की या देशात गद्दार जसे जन्मले त्याप्रमाणेच त्यांच्यापेक्षाही वरचढ असे बलीदानी देखील जन्माला आलेत. अलीकडच्या इतिहासातील उदाहरण घ्यावयाचे झाल्यास कश्मीर चे घेता येईल जेथे एका धार्मिक उन्मादातून देशद्रोह्यांनी कहर माजविला. त्याप्रसंगीच्या षंढ राजकारण्यांनी त्यांना एक प्रकारे मदतच केली आणि काश्मीर आतंकवादाचा गढ बनला. त्या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी देशातील व प्रांतातील सर्वच सुरक्षा यंत्रणांनी शर्थ केली आहे. एकास एक ह्या प्रमाणात देखील या यंत्रणांना आपले वीर गमवावे लागले आहेत. तरीही प्रयत्नांची पराकाष्ठा करून ह्या यंत्रणांनी नियंत्रण मिळविले आहे. सुरक्षा रक्षकांवरच्या अनेक हल्ल्या पैकी एक पुलवामा हल्ला संपूर्ण जगाला हलवून गेला.
 दहशतवादाच्या काळ्याकुट्ट इतिहासातील हा एक भयंकर दिवस आहे. पुलवामा हल्ल्याच्या विसरता न येणाऱ्या जखमांना देश आज पुन्हा स्मरण करीत आहे, पुढील हजार वर्षे करीत राहील.
 धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था कोलमडल्यानंतर किंवा नाकारल्यानंतर या देशाने सुरक्षाविषयक जी दुरावस्था अनुभवली आहे त्यातून धडा घेऊन देशाची पुढील वाटचाल व्हावी एवढेच अपेक्षित आहे 
कवि'रवि' 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home