Wednesday, 9 February 2022

रामराम भौ

माव्या साऱ्या भावाईले मावा पायटुनचा रामराम. झाली अशिन ना भौ तुमच्या वाली च्या न्यायरी? तं मंग चला जरा फिऱ्याले, यिवू पाहून कुठी कुठी काय व्हवून ऱ्हायलं ते!
हाव ना भौ, तिकळे पाच राज्यात विलक्षन व्हनार म्हंते बॉ. व्हवू द्या, आपल्याले कां करा लागते!? पन न्हाई राजे हो, त्या बंबई वाल्या संज्याले लयंच उत येयेल हाये. कां तं म्हंते आता मीच व्हईन ऊ पी चा शी यम आन माया भाकर खाऊ घालनाऱ्या मालकाले बनोतो पी यम.
 कां तं म्हंते बावा थे वाईन कां काय थे दारू नोय तं म्हंते नै तर्न्याईचं डिरिंक हाय म्हंते. मी म्हनो तवाच तं याच्या काट्ट्या तथी भागिनदारी कऱ्याले हरिकल्या. मले तं मोजता बी येत नाई भौ इतले करोळ त्या पोट्ट्याईनं भागिनदारीत पयलेच कमावले हायेत. मंधात थ्या कांगना बाईले म्हने हरामखोर, जवा बरसली कानि थे ह्या बयाळ्यावर तं मंग म्हंते कसा का हरामखोर म्हंजे विंग्रजी मंदी नौटी का काय थे होते. आता कां कराव भौ अशा दिड शायन्याचं सांगा राजे हो. मी म्हंतो भौ तुह्यावाली आन माह्यावाली भाषा कोन्ती? मराठी हाय का नाई! समजा आजुक फुळे जायाचं आशिन तं हात तंग असला तरी हिंदी हाये कानि संगतिले? मंग नस्ता आगाऊपना करून थ्या विंग्रजी भाषेचं गाढव अंगावर कां म्हून घेते लेक? नौटी म्हंजे हरामखोर काय वाईन म्हंजे दारू नस्ते काय, हा अर्ध्या हयकुंडात पिवळा व्हयेल बेलना आता तुम्हा आम्हा साऱ्याईले च्यूत्या समज्याले लागला भौ, तवा ह्येच्या पोतडीवर दन्के द्याच लागतिन तवा याचा भेजा जागीवर यीन राजे हो. अथी भरून ठूली आन आता म्हंते ऊ पी त जातो, ह्याले ठाव हाय काय, तथी लोकं निरे टपून बशेल हायेत का कवा हा येते आन कवा थे घोयसतात. नाई मंजी गेल्या बारीनं बी ह्याले चुयमुंग्या सुटल्या व्हत्या तं साऱ्याईचं डिपाजिट जप्त झाल्तं. या बारीनं तं मले वाट्टे हा सोता बी जप्तित जाईन का कानू बॉ. 
पायजा भौ आपल्या संत महंतायनं आपल्याले सांगून ठुयेल हाये का रागिट शायना पुरला पन गोडबोल्या मूर्ख काई कामाचा नसते. तवा आपुन थेच करू जे संतायनं शिकोलं. 
तुमाले काय वाट्टे थे तुमी मले लिवून पाठोसान ह्याची खात्री हाये मले. तवा आता रामराम घेवा अन् शायन्याईच्या बाजूनं जावा.
🙏 रामराम 🙏
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home