स्पर्श
शर आर्त भावनांना स्पर्शून आज गेला
क्षण तप्त त्या उन्हाला स्पर्शून आज गेला
नाते जरी न काही माझे आणि तयाचे
हलकेच का मनाला स्पर्शून आज गेला
संगे सदा मनाच्या संवेदना तरंगे
संचार भावनांचा स्पर्शून आज गेला
पार्थिव अन प्रवाही जग हे असेच आहे
आघात कोंदणांना स्पर्शून आज गेला
अतर्क्य भावविश्व कां हे 'रवि' असावे
हा एक प्रश्न मजला स्पर्शून आज गेला
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home