लाल परी आणि भुकेला कर्मचारी
सकाळच्या लॉंग वॉक साठी बाहेर पडलो
बस स्थानकाजवळ आलो तसा अवघडलो
चालता चालता दूरवर आलो केंव्हा कळले नाही
डाव्या बाजूला सहजच माझी नजर वळली नाही
लाल परी चं ते बस स्थानक हताश दिसलं
मला पाहून लाल परीचं निवास उदास हसलं
स्थानकाबाहेर चे धंदेवाईक दिसले नाहीत
पण भकासलेल्या टपऱ्यांचे ओघळलेले अश्रू नजरेतून सुटले नाहीत
गाव तालुके आणी शहरं यांच्या तील हा दुवा
एकाधिकाराने मिळवूनही शासनाला नकोसा व्हावा?
तेंव्हा देखील उजाडल्या गेली होती फार कुटुंबे
आजही तोच तो खेळ माजुर्ड्यांनी कां करावा
चाकं चालली होती तेंव्हा लाखों ना मिळे भाकरी
उपासल्या जीवांना अचानक कोठे मिळेल चाकरी!
आत्महत्या एका जीवाची शंभरांचा काळ ठरते
रंजल्या चेहऱ्यांवरी मग अश्रू वाचून काय उरते?
एक ऐका दांडग्यांनो महाभारताचे ही हेच झाले
अनर्थाने जे कमविले तेही सारे मातीत गेले
सेवाचारी तो खपूनी कमवितो सगळ्यांच साठी
तुम्ही सुद्धा भाजली ती त्याच्या श्रमाचीच रोटी
हात बरबटलेले तुमचे ईश्वराने पाहिले
घालण्या छापे तुम्हांवर अधिकारी त्याने धाडिले
अश्रूपूरित
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home