रामराम भौ
राम राम भौ,
कां म्हंता? औंदाच्या उन्हाळ्यात जरा जास्तच गर्मी व्हून ऱ्यायली? काच्यानं बॉ? रिजर्व बॅंकीनं गर्मी वाढोली म्हंता? हे मातर खरं हाये राजे हो!
तिकळे कर्नाटकात निवळणुका सरल्या कां नाई सरल्या तं लगीच रिजर्व बॅंकीनं ह्यो बॉम फोळ्ळा भौ. काहून तं म्हने कां ह्या नोटाईची जिनगानी खतम झाली, हां चार मैने बिन देल्ले भौ नयतुरन्या नोटा घिऊन जायाले. हे मंजे लयच झालं कानी भौ. "तुमी ने दर्द दिया है तुमी दवा देना" आसं जे काजून कोन शायर फायर सांगून गेला अक्शी तस्साच खेळ मांडला राजे हो ह्या बॅंकीच्या सायबानं.
तिकळे कर्नाटकात शपथविधी साठी सारे विरोधी पक्षनेते तंगडीत तंगडी घालून मोदी भौ च्या इरोधात फेर धऱ्याच्या इराद्यानं जमले व्हते ना भौ, पन ह्या दोन हजाराच्या नोटा वापस करा लागतीन ह्या कायजीनं सारा इस्कोट करून टाकला भौ. तंगडीत तंगडी घालून फेर धऱ्याच्या जागी लंगडी डान्स कऱ्याची पाई आली राजे हो!
तथुलचा शपथविधी सोवळा निस्तरलाई नोता कां हे नोटाबंदीचं कडू जहर पिवाची पाई आली राजे हो. तुमाले आठोते काय, रावुल गांधीनं निवळनुकाईच्या पयले कर्नाटकात सांगतलं व्हतं आमचं सरकार निवळून द्या तं मी साऱ्या माय माऊल्याईले दोन हजार रुपये माहवारी दीन. मले वाट्टे कां हे नोटाबंदीचं कारन असाव राजे हो. बॅंक म्हंते का दोन हजाराच्या वीस हजार करोडच्या नोटा वापरात हायेत आन दोन लाख सत्तर हजार करोडच्या नोटा गायब हायेत. तं त्या पडून पडून सळ्ळ्यावानी झाल्या हायेत आन फेकून द्या लागनार हायेत तं बदलून घ्या.
हाये कां नाई "आसमान से गिरे आन खजूर में अटके" वाली परस्थिती.
मले तं वाट्टे भौ कां ह्या निवळनुकाईच्या तोंडावर कोनं तरी थे पंधरा लाख परतेकाले कवा देसान मोदीजी असा प्रश्न इचारला व्हता. तवा मोदीजीनं डबलून खीसा फाळ्याची संधी घेतली हाये बॉ. कां म्हंता? पटलं तुमाले?
तं मंग व्हून जाऊ द्या 'मोदीजी की जय '
अथीच थांबतो, पुन्ना भेटूच!
रामराम 🙏
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home