सरडा पावर
मी नाही, नाही, नाही... नाही त्यातली
तरी...तरीपण सुमडी साठी कडी लावा आतली....... ||धृवपद||
भोगून भोगून जगली इथवर
भोगाची सवय लागली
भोगासाठी 'खिलजी' सारखी
आप्तांचीच गळी कापली ..........||१||
देश ही नाही धर्म ही नाही
जातीची केली माती
करून करून भागली आणि मग
आता निर्वाणीला लागली.........||२||
निर्वाणीला लागली तशी अचानक
मनात भरली भीती
घात जयांचा केला ते
आता दिसती डोळ्यांभोवती............||३||
सरड्या सारखे रंग बदलूनी
आपण गोडवे गाती
ज्ञानी पण एक असा उगवला
सोंगे सगळी उघडी पाडली ना ती.......||४||
"मरता क्या ना करता" तैसी
आता जाहली स्थिती
इकडे तिकडे धावत फिरती
पण ना चुके कर्माची गती.......||५||
म्हणे 'रवि' बहु होतील ऐसे
"सरडा पावर" वाले
महाराष्ट्र परि ना सोडी शिकवण
जी दिधली संतांनी ती..........||६||
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home