Saturday, 6 May 2023

रामराम भौ

दोस्तहो रामराम,
औंदा गर्मी चा मौसम आन राजकारनातली गर्मी दोनी लय तापून ऱ्हायले भौ. तुमी तं सारे सदा न कदा मोबाईल तोंडासमोर घिऊन शान पायतच ऱ्हायता कुकडे काय चालू हाये थे! म्या काई अल्लग सांग्याची जरुरत तशी नाई पन म्हतलं आज इतवारी जरा आपुनच हवापान्याले चाट दिऊ आन राज्यात जे काई सोंगं चालू हायेत थे लिवाची कोशिश कराव.
तं कसं हाये ना भौ, राजकारन आन बिलंदर गिरी हे ज्यायनं आपलं बिरूद धरलं त्याईले हमेशाच कशी कां असो ना बातम्याईत ऱ्हायाची सवय लागते तशीच गरज बीन ऱ्हायते.
कशी म्हंता? तं जरा मैन्या भराच्या, राजकारनाले ऊत आननाऱ्या नेत्या कुत्याईच्या राज्य भर चालू असलेल्या फेऱ्या जर्रा डोयासमोर आना, मी काय म्हंतो थे बातच ध्यानात यीन. 
थे पक्ष नसलेल्या अध्यक्षाचे दौरे काय,
 जलमजात अध्यक्ष असल्यावरई ज्याले आपल्या असन्यावर भरोसा नाई, 
मनशे मनशे म्हनत म्हनत ज्याईचा दम निंगून ऱ्हायला,
 सवताले वंचित म्हनतानी ज्याले एशी च्या बाहीर निंगताच घाम फुटते, 
काकाच्या करतूतीले कुनी कावला,
 तं लेकाच्या ऐयाशीनं ज्याचा घात केला,
 अशे सारे आमच्या गरीब गुरब्याईचे वाली मवाल्यावानी रस्त्यावर बयाळ्ळ्या वानी उन्हातान्हात सभावर सभा घिऊन ऱ्हायले भौ.
आता तुमी म्हनसान कां सभा घेनं हे तं त्याईचंच काम हाये, तं ते बी खरंच हाये म्हना, काहून कां लोकाईले यायचं काम डोयात अंजन घालून पायलं तरी दिसत नाई. दिसतात फकस्त घोटाये घोटाये आन घोटाये. मंग बोंबलून बोंबलून सांगा तं लागीनच ना भौ कां थे काई खरं नाई आन आमी सांगतो थे ऐका. आपुन साधारन मानसं, आपल्या मनात हेच ऱ्हायते कां बॉ आपल्याले सारं ठाऊक असलं तरी जावाव एकडाव पुन्ना काय नयी पुळी सोळते थे पाह्याले. तं गर्दी पायताच ह्याईले अजून जोश चळते. राजे हो, आपल्यालेच सांगतात कां "पहा ही अलोट गर्दी पहा" हे आमचे समर्थक आहेत. खरं काय ते तुमी आमी जानतो ना भौ! जावू द्या, त्याईचं त्याईले लखलाभ. 
हां, आपुन मातर मनात गाठ बांधून ठिऊ भौ, कां कोनाच्या सोंगाले आमी भूलनार नाई, आमचं भलं आमीच घडवून आनू. ऐऱ्या गैऱ्याईच्या नादाले कसंच लागाचं नाई.
बाकी सारं आलबेल हाये भौ! 
पुन्ना भेटूच. 
तुमचाच
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home