Sunday, 28 May 2023

रामराम भौ

रामराम भौ
राजकारन नावाचा एक असा मसाला इरोधी पार्टी वाल्याइनं तयार करेल हाये भौ कां त्याईले वाट्टे जवा मन व्हईन तवा घाल कोन्याई बासनात आन बसा वाट पाहात कां जमतेच भट्टी.
मी म्हंतो भौ, मले सांगा वात्तळ्ळया पिद्या किती शिजोसान तरी थ्याइले चव यीन कां बाप्पा? हे इरोधी पार्टी वाल्याइनं काजून कोनाचा मंतर घेल हाये कां आली निवळनूक कां व्हतात सारे जमा, आनतात वायल्या सुकोळ्या पिद्द्या, घालतात थ्याच मयकल्या भगुन्यात आन बसतात लाकळं खोसत त्याच्या बुडाखाली भौ. मसाला म्हनसान तं थोच जुना पुराना जळमटायनं भरलेला, मंजी या बी जे पी ले अन मोदी ले हरवाचं नावाचा ठराव मसाला. 
मले मालूम हाये भौ, पब्लिक लय शानी झाली राजे हो. थे काई बस्सर जात नाई अशा भुलभुलैया ले पन हौ राजे हो ते जवा गुलाबी, हिरव्या रंगाच्या नोटीवर गांधी बाबाले पायते तवा भरोसा करते का भौ गांधी बाबा नोटीच्या रुपानं आला आपल्याले समजून सांग्याले कां हे नोटा घिऊन शान आले थे सारे माहे पिठ्ठू हायेत आन ह्याईले मतदान करजा. 
ज्याइनं अनुभवानं आपलं मत बनोलं थे बाबाले नोटीवर पायतात, समजून जातात कां बाबा तं नोटीवर मजबूरीनं बशेल हाये आन आपल्याले काई सांगत नाई तवा थे लोकं गुपचूप नोट खिशात घालतात, म्होरच्याले सांगतात कां काई कायजी कराचं काम नाई, खिचडी तुमचीच पकनार हाये, लाकडं मातर चोखट लावजा.
पन असं जरी असलं भौ, तरी लय लोकं अशे हायेत कां त्याईले अजून बी पैशे घिऊन येनारा आपल्या फाटक्याचं पोतिरं करून आपल्याच घराले सारोन घालून आपल्याले पुरता नंगा करनार हाये, हे समजत नाई भौ.
औंदा मोदीजीनं साऱ्या जगात भारताचं नान एक नंबर वर आलं थे आपल्याले दाखोलं, जिकळे तिकळे विकासाची परचिती अवघ्याईले दिसते हाये. मंग आपलं काम बनते ना भौ का आपन आपल्या परीनं हे समद्या जनमानसाले समजून देवाव कां लोकहो जनहित म्हंजे तुमचं आमचं साऱ्या माय माउल्या अन लेकरा पाकराईचं हित. आता मोदीबाबा अशीन तं हे सारं हुईन. नाई तं पुन्ना थेच भ्रष्टाचार अन आपल्याले पस्तावा.
तं भौ चला मंग जसं जमीन तसं आपन परयत्न करू कां लोक चांगला इचार करतीन अन फुळे भविष्य साजरं करतीन.
रामराम भौ!
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home