Thursday, 29 June 2023

जय हरी

माह्या माय माऊली ले दंडवत घालतो अन् भौ तुमाले साऱ्याईले जय हरी.
भौ आज देवशयनी एकादशी हाये आन असं
म्हंतात कां आज रोजी पासून देव चार मयने काई मानसा कळे ध्यान देत नाई. तं म्हतलं बावा आपल्याले समजलं तसं तुमाले सांगाव. नाई तं मंग तुमी म्हनसान कां बॉ सांगतलंच नाई. आसू द्या राजे हो, मले मालूम हाये कां तुमाले धर्माचं ज्ञान माह्यावून जास्तच हाये, पन मजाक कऱ्याले काय जाते भौ.
तं सांगाचं आसं कां मी बिन गेल्तो देव दर्शनाले पांडुरंगाच्या पाया पड्याले.गर्दी मंधी मले काई कोनी घूसू देईना भौ. करता करता मंग साऱ्याईच्या मांग आखरी वर मावा नंबर लागला देवा. मंदीरात गेलो तसा पुजारी म्हंते चला चला लवकर दर्शन घ्या आन निंगा भाईर, देवाची निज्याची टाईम झाली. म्या मनात इचार केला कां भौ देव तं चार मैने काई उठतीन न्हाई आन आज त्याईले लोकाईनं लय सतावलं, तवा जरा देवाचे पाय दाबून द्याव. तं मी बसलो देवाच्या पायाजोळ अन् पाय चेपू लागलो. करता करता भौ मले काजून कशी पन तंद्री लागली, पुजारी कवा गेला मले समजलं नाई, पुजाऱ्याले मी दिसलो कसा नाई थे मले काई मालूम पळ्ळं नाई.
तंद्री लागली तशी पायतो तं काय माह्या पाठीवर रखुमाई हात फिरवत मले म्हंते कशी कां लेकरा अरे साऱ्या दिसभर तुले कोनं रांगीत उभं ऱ्हाऊ देल्लं नाई, तुवा कोनाले घोटभर पानी मांगतलं नाई कां एक घास खायाले मांगतलं नाई. पोरा तुया मनात मले अन् पांडुरंगाले कायम बसवून ठिवलं हाये तरी काह्याले रे पोरा इतका आटापिटा केला. 
म्या म्हनलं माय, लोकं सांगत व्हते कां आजपासुन देव जातात निजाले आन मंग चार मैने काई वापस येत नाई. तवा माय मले कायजी लागली कां मावं कसं व्हईन. मले तं माय पायटून उठलो कां तुमाले आठवाची सवय लागेल हाये, तुमी निजेल ऱ्हायसान तं आवाज कसा द्याव? 
माया डोयातले भाव माय माऊलीनं कशे काजून वळखले अन् मोठ्या मायेनं मले म्हंते कशी कां अरे तुया ध्यानी मनी सपनी आमी ऱ्हायतोच सदानकदा! मंग तुले कायजी कराचं काम नाई पोरा. कायजी त्या लोकाईले करा लागते जे मले टाईमपास समजून येतात. त्याईले वार पाहा लागते, तीथ पाहा लागते, मुहूर्त पाहा लागते. तुया साठी तसं काई नाई रं पोरा. जाय आता बिनधोक घरी जाय!
मोठ्या आनंदात मी जागी झालो भौ आन घरी जायाले निंगालो. पायतो तं काय मंदिराचा दरूजा भाईरून बंद आन मी आत फशेल. 
खरं सांगतो भौ मले जराक बिन कायजी वाटली नाई, मी बसलो आपला पांडुरंग पांडुरंग करीत.
पुजाऱ्यानं पायटी दरूजा खोल्ला न आत आला. मले मंदिरात पाहून चक्रावून गेला, हबकून मले म्हने कां अरे मले जायाच्या पयले आवाज दिऊन थांबवा लागत नोतं काय. रातभर मंदिरात कोंडल्या गेला नसता हकनाक. तसं म्या म्हनलं पुजारी बुवा देवाले तं तुमी रोजच कोंडता, तवा तुमाले कायजी वाटत नाई का देवा.
तसा पुजारी ढसाढसा रडू लागला अन मले म्हने माऊली धन्य तुहे इचार अन धन्य तुहे आचार. म्या म्हनलं जाऊ द्या पुजारी बुवा आता देव चार मैने निजाले गेले हायेत तवा चोख्खट इचार करा आन देव परत येतीन तवा त्याईले कोंडून ठेवा लागीन नाई याची कायजी करा. जातो आता जय हरी.
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home