Wednesday, 7 June 2023

माकळाच्या हाती कोलीत

कसं काय?
हे मले इचाराचं हाये का भौ राजकारन कराले काय कोनाले देशाबाहीर जावा लागत असते!?
का मंग राजकारन आपल्या मानसाईच्या मंधी ऱ्हावून, त्याईचं सुख दुख समजून, त्याईचं भलं कायच्यानं व्हईन त्याचा इचार करून व्हत असते!!?
नाई म्हंजे कसं हाये का सौताले भावी परधानमंतरी म्हूनशान दिवसा रात्री जो सपनात पायते थो ज्याले कांग्रेस वाले युवराज युवराज करून मुजरा करतात थो रावुल बाबा तिकळे ईलायतेत जाते, अमेरिकेत जाते अन् भलकाईच्या भलकाई बोंबाबोंब करत फिरते. ह्या गैभान्याले इतलं बिन समजत नाई राजे हो का बाबुन्या अरे तू जे काई तथी भकलतं थे जसं च्या तसं अथी आपल्या देशात एकून एक जन समक्ष पायते. नाई जमलं त यूटूब वर फुरसतनं पायते आन पोट्ट्याई पासून तं मथाऱ्या लोग सारे च्या सारे लय मजा घेतात भौ. आपल्या मायबोलीत एक म्हन हाये कानी भौ का म्हंते "धड बोल नाऱ्या, तं म्हने घराले आग लागली".
आता हे काय देशाचं भलं करनेवाल्याचं लक्षन हाये का भौ. अशा बैलंभारतीच्या हातात सत्ता देल्ली तं साऱ्या देशाचं वाटुळं व्हईन कानी भौ?
तं माह्य सांगनं हेच आये का ह्या कांग्रेस वाल्याईची अशी कोंती नस ह्या गांध्याईच्या बुडाखाली दबेल हाये कां हे सारे त्याईच्या म्होरं नीरा मुर्दाड बनतात भौ. खरं पायलं तं आपल्या महाराष्ट्रातले कांग्रेसी नेता आपापल्या परीनं सौताची आब राखून हायेत कानी भौ? मंग त्याईनं सौताले अलग करून एखांद्या नवीन पक्षाची स्थापना करून वालं व्हाव कानी. अरे म्याटाच्या संगतीनं सारे म्याटच व्हतीन, खरं हाये कानी भौ?
अन समजा हे जर कां त्याईले जमत नशीन तं मंग आता एकच उपाय शिल्लक ऱ्हायते भौ कां साऱ्याच्या साऱ्या कांग्रेस वाल्याईले द्याचं धक्क्यावर लावून आन कराची "जै रामजी की"
चला भौ,रजा घेतो. पाहा, पटत अशीन तं बाकीच्याईलेई सांगजा.
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home