पाऊले चालती
पाऊले चालती पंढरीची वाट
चारी ठाव खाऊनी जेंव्हा भरलेसे पोट
पाऊले चालती.....
आप्त ईष्ट आणि अवतीभोवती चे
सांगाती बैसोनी जेंव्हा दाखवीती खोट
पाऊले चालती.....
बायकोची पोपटपंची दु:ख देई भारी
तेंव्हा त्या कैवाऱ्याला आळवीती ओठ
पाऊले चालती......
म्हणे 'रवि' ऐका सारे आपुल्या मनाचे
पांडुरंगा चरणीं देखा अमृताचा घट
पाऊले चालती पंढरीची वाट
पाऊले चालती पंढरीची वाट
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home