Saturday, 29 July 2023

राम राम भौ

काल यूटूप वर पाह्यलं का भौ आपल्या शरदभौ पेंडसे ह्यायची पोरगी म्हनं पायलट झाली. इमान चालोनारी पायलट. हां हां तश्शीच पायलट. 
तं मंग झाली पायलट तं व्हवू द्या. आपल्याच्यानं झालं तं कौतुकच कराव आन न्हाईच जमलं तं गप गुमान ऱ्हावाव. काहून का भौ आपल्या लेकरांचं कौतुक आपल्यालेबीन आसतेच ना भौ. मंग तसं ते शरद पोंक्षे जी ले अशीन तं कोनाची दुख्याचं काई काम हाये का भौ. पन न्हाई अठी तं पायलीले पन्नास रिकामटेकडे निरा बकवास कऱ्याले पडेल असतातच राजे हो.
तं ह्या बकवास महर्ष्याईनं लगीच पोकळ बाश्यातून बोंबाबोंब लावली ना भौ जोऱ्यानं. 
म्हनं काय तं शरद भौ नं आपली पोरगी आरक्षन न घेता पास झाली असं बोल्याले नाई पायजे. 
मी म्हंतो काहून बॉ? त्या भल्या मानसाच्या भल्या लेकीनं बापाच्या मेहनतीचं चीज केलं तवा त्याले खुशी तं व्हईनच! मंग तीले मोठं कऱ्यासाठी त्यानं काय खस्ता खाल्ल्या, त्याले काय तरास झाला थे बीन तो सांगते तं समजून घ्या लागीन कानि भौ? मंग तोंडं इचकावनाऱ्याईची ऐशी तैशी कऱ्याची जिम्मेदारी आपल्याले घ्या लागीन हे बी जरूरी हाये. तवा मी म्हंतो ह्या भामट्याईले त्याईच्याच भाषीत इतलं बुकलून काढाव का ह्याईच्या मालकानं ह्याईचा भाकरतुकडा बंद केला पायजे.
चला भौ भेटू पुन्ना 'रामराम'
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home