कविता: वणव्यांच्या लोटातून...
वणव्यांच्या लोटातून वाहणारी वाट ती
मजला अशी का खुणविते
ज्वलनाच्या पोटातून निर्मिलेल्या ह्या जीवाला
ती बरे कां हिणविते
एक चिंगारी व्यथेची दग्ध करुनी रात्र सारी
कां सकाळी शमविते
जीवनाला जीवनाच्या सार गर्भा पासुनी
दूर ती कां ढकलिते
कोणत्या कूष्मांतुनी प्रसविलेले प्रस्थ म्हणुनी
अंतरी कां भिनविते
येथला सारा पसारा निर्मिला त्याने जरी
मज मोहमाया भुलविते
शिशिराच्या झडपडीला पालवी पुन्हा नव्याने
कां बरे हो फुलविते
वणव्यांच्या लोटातून........
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home