Tuesday, 12 May 2026

गझल:अन्वयार्थ

न स्वतः साठी ना जमान्यासाठी मित्रांनो 
आता जगणे उरले फक्त श्वासांसाठी मित्रांनो 
देहाची धडपड आणि मेंदूचा वेग उगाच छळतात 
वावटळीच्या वेदना अखेर विरतातच मित्रांनो 
डोळ्यांची झाकणं कधी उघडी-बंद सवयी नुसार 
अंतरीच्या काळोखाची घुसळण व्यर्थच मित्रांनो 
देह-देव-निसर्ग आणि प्रारब्ध जीवनाचं संचित सारं 
श्वासांना श्वासाचं महत्व देतात मित्रांनो 
अखेरची बाब म्हणता म्हणता अखेर कधी येत नाही 
श्वासांना विराम मिळताच पुन्हा नवी सुरुवात मित्रांनो 
जन्मोजन्मीचा हिशोब ठेवाणरा तो "स्वर्गस्थ" 
कधी 'शाई संपली' असे नमूद करेल कां मित्रांनो 
कवि 'रवि' 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home