Tuesday, 19 October 2021

एक दृष्टांत

अनुभवाविण सारेच लटके. एकदा एक अतिउत्साही माणूस गारुड्याकडे गेला आणि त्याला १०० रुपये देऊन म्हणाला मला साप पकडायला शिकव. गारुडी म्हणाला त्यासाठी जंगलात चला. त्यावर तो म्हणाला मी ज्ञानी आहे तू मला येथेच काय ते सांग मी समजून घेईन आणि प्रसंगी उपयोगात आणीन. गारुड्याने त्याला यथाशक्य सगळे समजावून सांगितले. तो मनुष्य आनंदाने घरी परतला आणि दररोज मनातच कल्पनेने साप धरू लागला, कांहीं काळानंतर असा प्रसंग उद्भवला की त्याला जंगलात शिरावे लागले आणि उशीर झाल्यामुळे एका झाडाखाली मुक्काम करावा लागला. श्रमामुळे त्याला गाढ झोप लागली. सकाळी त्याला जाग आली तेव्हा बघतो तर काय त्याच्या शेजारी एक नाग फणा काढून स्वस्थ बसलेला आणि त्याच्या कडेच दृष्टी ठेवून आहे. तो ज्ञानी मनुष्य शीघ्रतेने गारुड्याची शिकवण आठवू लागला. गारुड्याचे शब्द त्याला स्पष्ट आठवत होते पण हातपाय काही वळायला तयार नव्हते. त्याची तारांबळ बघून शेवटी त्या नागानेच त्याला अभय दिले आणि बोलता झाला "हे ज्ञानी माणसा, घाबरू नकोस! तुला दीर्घ निद्रेत बघून मी तुझे रक्षण व्हावे यासाठी तुझ्या शेजारी बसून आहे'. नागराजाचं हे असं अकल्पनीय वर्तन बघून त्याला आपल्या नसलेल्या ज्ञानाचा वृथा अभिमान बाळगल्या बद्दल घृणा वाटली आणि तो नागाची माफी मागत म्हणाला 'हे नागराज आपण माझ्या प्रती जी मित्रता दाखविली आहे ती प्रशंसनीय तर आहेच पण माझ्या सारासार विचार करण्याच्या दृष्टीला देखील जागृत करणारी आहे. आज मला स्वानुभवातून हे निश्चित कळले आहे की कुणी कुणाचा कायम शत्रू असू शकत नाही तर परीस्थिती नुरूप प्रत्येकाची प्रतिक्रिया असते. असो! ह्या पुढे मी कुणाही विषयी मनात किल्मिष बाळगणार नाही.
कवि'रवि'

Monday, 11 October 2021

टिळक गांधी आणि गुरु गोखले

भारतीय स्वातंत्र्याच्या २०व्या शतकातील इतिहासामध्ये लोकमान्य टिळक आणि मोहनदास गांधी ही दोन व्यक्तिमत्त्वे अशी आहेत की ज्यांना गोपाळ कृष्ण गोखले जी सारखे राजकीय गुरू प्राप्त झाले, विडंबना अशी की एक जहाल मतवादी बनला आणि एक मवाळ भूमिका घेणारा ठरला. चरित्र विषयक बोलायचे झाले तर टिळक मरेपर्यंत निष्कलंक जीवन जगले आणि गांधी मात्र अनेक विरोधाभासी चरित्रांचा पुलिंदा बनले. गुरु सुद्धा शिष्य घडवू शकत नाहीत हे गुरु द्रोणाचार्य ह्यांचे कडून समजता येते. टिळक मरेपर्यंत राष्ट्रभक्ती ला समर्पित होते आणि गांधी हत्या होईपर्यंत आत्मकेंद्रित आणि इंग्रजी सत्तेचा पाईक, बहुसंख्य भारतीयांना कस्पट समजून जगत राहिले. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर राजकारणी टिळकांच्या प्रखर राष्ट्रवादी विचारांची उंची गाठू शकले नाहीत परंतु गांधी च्या स्वार्थी कृती प्रकृतीची संगत त्यांना सोईची वाटली. ७४ वर्षांचा काळ लोटला आहे तरीही गांधी नावाची कुबडी घेतल्या शिवाय राजकारण करता येत नाही हा भ्रम काही संपत नाही. मोदींच्या भाषेत एक लकीर को छोटा दिखाना होगा तो दुसरी बडी लकीर बगल में खींचो, ह्या उक्ति नुसार आम्हाला देखील टिळक सावरकर ह्यांचा उद्घोष उत्कटपणे करायला हवा.

Friday, 8 October 2021

देवी स्तुति

हे देवी दयावती अंबे माँ
मैं तेरी शरण जगदंबे माॅं......|धृवपद|
भक्तों को सुख दात्री तू
शरणागत की मातृ तू
गुणवर्णन क्या करूं तेरा
मेरे लिए जगधात्री तू.........||१||
सकल विश्व की माता तू
देवादिक की त्राता तू
आदि भवानी शक्ति सुरी
जग पालक जय गाथा तू ....||२||
देवी दयावती अंबे माॅं... मैं तेरी शरण जगदंबे माॅं
कवि'रवि'

Friday, 1 October 2021

वेदना संवेदना

वेदनांचा अंत होता कां कुणी जीवंत राहे
वेदना असती म्हणोनी आपुले अस्तित्व आहे
प्राणी पक्षी भांडता बघोनी 
व्याकूळ मन होते कसे
छळताना प्रकृतीसी बघता
अश्रु ही द्रवितसे
आलिया पूर त्या नद्यांना उध्वस्त शेती होतसे
त्या नजाऱ्यास बघता छिन्न हे मन होतसे
दृष्टी क्षेपातून माझ्या उमटते ती वेदना
मी जसा आहे गड्यांनो तद्वतची ती संवेदना
पितृपक्षातील ह्या दिनी 'पितरे' बघती मला
दिसती मजला नेत्रांत त्यांच्या 
वेदनांच्या त्या खुणा
कवि'रवि'

स्विकृती और विकृति

जय श्री राम मित्रों 🙏
आज अर्थात २ अक्टूबर एक ऐसा दिवस हैं जिन्हें हम अपने स्मृति पटल से कभी हटा नहीं सकते। जी हां यह कटु है लेकिन सत्य है कि इतिहास में आज ही के दिन इस भूमि पर स्विकृती और विकृति दोनों का जन्म हुआ था। एक वो था जो कभी इस देश में रहने की कल्पना भी नहीं करता था और अंग्रेजी चकाचौंध का दीवाना था, ऐयाशी जिसके जीने का मुख्य कारण था। लिहाज़ा उसने विदेश यानी कि दक्षिण अफ्रीका में ही अपना वास्तव्य बनाने में भलाई समझी। २१वर्ष वहां बिताने के पश्चात् जब उसे भूरी चमड़ी वालों ने लताड़ा तब अक्ल आई कि अपना देश बहुत सुंदर है। दुर्दैव से हम इतने भोले हैं कि इस बगुला भगत को पहचान नहीं पाए और आज न चाहते हुए भी उसका भूत हमारे सर पर हावी है।
मित्रों, दुसरा व्यक्तित्व वो है जो सशक्त भारत की कामना लिए राजनीति को सेवावृत्ति बनाकर जीवन जीने का आदर्श स्थापित करना चाहता था। "जय जवान जय किसान" जैसा देश हित को जगाने वाला नारा देकर जिसने अल्प समय में देश के हर नागरिक की स्वीकृति हासिल की थी। जिसके कहने पर देशवासियों ने सप्ताह में एक दिवस का उपवास तक अपना लिया था।
संक्षिप्त में यही कहना चाहूंगा कि हमें आज का दिवस आदरणीय दिवंगत प्रधानमंत्री लालबहादुर शास्त्री जी को स्मरण कर मनाना चाहिए न कि ढोंगी पाखंडी अधर्मी गांधी को।
आप सभी स्नेहीजनों की राय मुझसे सहमति की होगी इस बात पर मुझे कोई शंका नहीं।
आइए भारत को महान बनाने के लिए आवश्यक पहल करते हुए सच्चा इतिहास लिखें और नयी पीढ़ी को सही दिशा दिखाएं।
कवि'रवि'