सांजवेळ जेंव्हा मद्याच्या प्याल्यात उतरून येते
मद्यप्यांना तेंव्हा चहूकडे साकीच दृष्टीस येते
महफिलीचा कैफ असा बदनाम कां आहे
प्रत्येकाला एकदा चाखून बघण्याची हौस येते
मद्यगृहाची वाट तितकी सरळ नसतेच कधी मित्रांनो
दु:ख-भावनांचं युद्ध होते तेंव्हा ती दिसून येते
हृदयाच्या जखमांवर औषध बनते साकी ची दृष्टी
एक आंतरिक समाधान उगवते जेंव्हा ती येते
आज जरी वेळ इतकी रुष्ट झालीय तुझ्या वर 'रवि'
यातून पार झाल्यावरच पुढे सुखाची वेळ येते
कवि 'रवि'