Monday, 31 January 2022

संजय आख्यान:

अथ वाईन पुराणं
कलियुगातील भरतखंड (वास्तविक खंड खंड) प्रांताच्या मध्यवर्ती प्रगणे 'महाराष्ट्र' क्षेत्रात एक त्रिकांड बहुगुणी शासन (अ)व्यवस्था उदयाला आली. राज्यातील जनतेला जे अवांछनीय ते सगळे प्रथमाधिकाराने स्विकार्य असे मानून हे सरकार एकामागून एक निर्णय घेऊन अचंब्यावर अचंबे उभारू लागली. बारमालकांकडून १०० कोटी एतद्देशीय मुद्रा मासिक राशी म्हणून वसूल करण्याचा निर्णय ही जणू काही जनतेला दिलेल्या वचननाम्यातील अधिकृत कलमं असल्यागत सरकार वागत होते. गंमत अशी की वर्तमान युगात "जाणता राजा" एकची होता पण त्याची मती कुंठित झाली की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. कोणत्याही टिका करणाऱ्या सामान्य माणसाला राजद्रोही मानून ह्या सरकारची पिलावळ हरप्रकारे प्रताडित करायला लागली. कुणाला मारझोड तर कुणाचं टक्कल, कुणाच्या अंगावरील कपड्यांचं विच्छेदन करणं ही राजनिष्ठा दर्शविण्याची प्रमेय ठरू लागली. कष्टाळू परिवहन कर्मचारी देशोधडीला लागले, मंडळाच्या साधन सामग्री ची विल्हेवाट लागू लागली पण त्यावर भाष्य करणं किंवा योग्य निर्णय घेणं ही कुणाचीही आवश्यकता राहिली नाही. अशा परिस्थितीत कुणास ठाऊक कसा पण सरकारला शेतकऱ्यांचा कळवळा आला आणि दुकाना दुकानातून 'वाईन' नावाच्या द्रव्याला विकण्याची मुभा देऊन शेतकऱ्यांना 'स्वर्णकाळ' आणून देण्याचा दिव्यशोध लावला गेला. आता अर्थात वाईन म्हणजे दारू नाही तर स्वास्थ्य वर्धक जीवन तारक अन्नातील अविभाज्य घटक असल्याची बतावणी पूर्ण जोशात केली गेली. हां हां म्हणता राज्य भर एका (अधोगतीचा) क्रांतिचा उदय झाला. शहरे-गांवे-खेडी-वस्त्या सगळीकडे 'वाईन साठी लाईन' लागू लागली. घराघरातील तीन पिढ्यांमधील संवाद कांहीसा असा होऊ लागला: 
काय झालं? बाळ रडत होतं- वाईन चा घोट दे त्याला!
काय झालं? बाबा बोलत नाहीत- वाईन चा ग्लास दे त्यांना!!
काय झालं? ताई चिडचिड करतेय- वाईन जरा पाज तिला!!!
लग्न कार्यात येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत आम्ही इतर सुगंधी (पान पराग) द्रव्यांऐवजी वाईन ने करुया अशीही टुम निघाली. रस्त्या रस्त्यात चौका चौकात पोलिस दादा तंटामुक्ती साठी वाईन प्राशन अभियान राबवू लागले. न्यायाधीश-वकील-फिर्यादी आणि आरोपी एकत्र बसून वाईन द्वारे न्याय निवाडा करू लागले. होता होता वाईन ला इतके सुगीचे दिवस आले की वाईन सहजी मिळणे दुरापास्त झाले. मग काळा बाजार, त्यातून उखळ पांढरं करण्याची सुवर्णसंधी हे सगळं ओघानं आलंच. सत्ताधारी मंडळींच्या पिलावळीचं सर्वत्र आलबेल झालं. सगळे सत्ताधारी मातब्बर झाले. वाईन सहजपणे बाजारात उपलब्ध नाही असं निदर्शनास येताच मग मागल्या दाराने नेतृत्वाने एक फतवा काढला. वाईन उत्पादकांच्या अर्थात शेतकऱ्यांच्या घरांवर धाडी घाला. असेल नसेल ते सगळे जप्त करा. आमच्या जनतेला नाडतोय हा शेतकरी असे सूचक विधान करून त्यांना तहस नहस करा यचा जणू विडा उचलला गेला आणि शेतकऱ्यांना अंती "अंताचा मार्ग" सुकर करून देण्यात आला. शेतकरी पुन्हा एकदा वैकुंठ मार्गास प्राप्त करता झाला.
अशी ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी दुफळ अपूर्ण...... लोकशाही भगवान की जय 
कवि'रवि'

Friday, 28 January 2022

आधुनिक हिंदु समाज आणि देशापुढील समस्या

कोणे एके काळी.....हो कोणे एके काळीच म्हणावे लागेल. भारतामध्ये हिंदु संस्कृतीचा उगम झाला आणि ती परकियांची असंख्य आक्रमणे झाली तरीही अबाधित राहिली. हिंदुंचे संस्कार मुख्यत्वे घराघरांतून प्रत्येकाच्या मनात आणि आचरणात झिरपत जायचे! यवनांच्या आक्रमणाने काही हिंदु आपला धर्म सोडून मुसलमान बनले त्याला अनेक कारणे आहेत, असूद्या पण त्यांची जीवनशैली मात्र फार काही बदलली नव्हती कारण त्यांना हे चांगले ठाऊक होते की आपल्या परिवाराची नाळ ही हिंदुंसोबत जोडलेली आहे. 
साधारणपणे २० व्या शतकाच्या सुरुवातीला भारतामध्ये ख्रिस्ती धर्मिय पादऱ्यांचा शिरकाव झाला आणि त्यांनी अतीशय व्यवस्थितपणे येथील आदिवासी जनजातींमध्ये आपले पाय पसरायला सुरुवात केली. त्यांनी केलेल्या अभ्यासात त्यांनी हे हेरले होते की भारतातील जनजातींमध्ये हिंदु धर्माच्या धुरिणांचा फारसा पगडा नाही आणि त्या आदिवासीयांना शहरं,गांवे किंवा मंदिरे ह्याचं फारसं कौतुक नाही. ते आणि त्यांच्या परंपरा ह्या प्रामुख्याने त्यांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. तर ह्या पादऱ्यांनी चलाखीने ह्या लोकांना भ्रमित केले आणि त्यांचे धर्मांतरण केले. दुसऱ्या अर्थाने त्यांनी भारतात ख्रिश्चनांची संख्या वाढविण्यावर भर दिला, त्यांच्या जीवनशैलीला कोणतीही क्षती न पोचविता हे केले. असो!
भारतीय समाजातील बहुतांश हिंदु चिंतकांनी समग्र भारत ही संकल्पना अवलंबून भारतामध्ये राज्य करणाऱ्या परकीय शक्तिंना संपवून अखंड भारत स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आणि त्याकरिता अवघा देश स्वातंत्र्य प्राप्तिच्या आशेने प्रेरित झाला. घोर संघर्ष झाला, लाखोंच्या घरात जीव हानी झाली, हजारो परिवार नष्ट झाले आणि हिंदु मुसलमान अशी फाळणी होऊन आधुनिक भारताचा उदय झाला. स्वातंत्र्योत्तर काळात अर्थातच सत्ता त्यांच्या हाती गेली जे सतत तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या आसपास होते आणि चाणाक्ष पणाने स्वतः ला भारतीयांचे प्रमुख म्हणून दर्शविण्यात यशस्वी होते. तसं सिद्ध करताना त्यांनी अनेक सच्च्या देशभक्तांचा बळी दिला तो भाग वेगळा. उल्लेखनीय हे की त्यात ही बहुसंख्य हिंदुच होते. राज्यकर्ते म्हणून स्वतंत्र भारताला हिंदुद्वेषी पण धर्माने हिंदुच असलेले नेतृत्व लाभले आणि त्यांनी शिस्तशीरपणे हिंदुंच्या जीवन पद्धती वर आक्रमण करायला सुरुवात केली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वेच्छेने लढलेल्या हिंदुंना कह्यात घेणे सहजी शक्य नव्हते आणि म्हणून त्यांच्या संस्कारशील मनांवर घाला घालण्याचे षड्यंत्र रचले गेले. इतिहास बदलण्यापासून तर सणावाराला सुट्टी कपात करणे, मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मियांच्या तथाकथित सणांना फाजिल महत्त्व देणं, रविवारी साप्ताहिक सुट्टी, इंग्रज वापरत असत ती साधन सामग्री घरा घरात स्टेटस सिम्बॉल बनवून हिंदुंची स्वधर्माप्रति असलेली आस्था कमकुवत करण्यात ती सत्ताधारी मंडळी बऱ्याच अंशी यशस्वी देखील झाली आहेत. कॉन्व्हेन्ट चं शिक्षण हा जणू उच्च वर्णीय असल्याचा संकेत निश्चित व्हायला लागला. मुसलमान समाजातील बहुतांश परिवार गरीब आणि आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या उत्पन्ना करिता हिंदुवरच अवलंबून असल्याने त्यांनी फारसा कधी द्रोह पत्करला नाही परंतु, जसजशी सामाजिक स्थिती बदलू लागली, त्यांच्या मशिदींमधून हिरव्या पगडी वाल्यांची अर्थात तबलिगी जमातीच्या लोकांची वर्दळ वाढू लागली तसतसे ते देखील हिंदु विरोधाने ग्रसित होऊ लागले. संधीसाधू राजकारणी, विशेषतः कांग्रेस आणि त्यांच्या विच्छेदनातून प्रकट झालेले इतर क्षेत्रीय पक्ष आजतागायत ह्या भट्टीवर आपला पानगा शेकताहेत. 
ह्या अशा परिस्थितीत आजचा हिंदु नेमका कुठे आहे ह्याची मिमांसा करणं क्रमप्राप्त आहे आणि म्हणूनच ह्या लेखाचं शीर्षक आधुनिक हिंदु समाज आणि देशापुढील समस्या असं दिलेलं आहे. जेंव्हा पासून म्हणजे साधारण तीन दशकांपासून हिंदुंच्या हे ध्यानात येऊ लागले की तत्कालीन सत्ताधारी हे आपल्या विरुद्ध इतर धर्मीय असं समीकरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, साधारण तेंव्हा पासूनच हिंदुंमध्ये एक प्रकारची चिंता जागृत झाली आणि त्यांनी ह्या विषयावर उघडपणे व्यक्त होण्यास सुरुवात केली. हे ध्यानात आल्यावर तत्कालीन सत्ताधारी मंडळींनी पवित्रा बदलला आणि हिंदु मध्ये जाती जातीत तेढ निर्माण करीत पुढचा कांहीं काळ म्हणजे एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकापर्यंत राज्य करण्यात यश देखील मिळविले.
रामजन्मभूमी चा विषय हाती घेऊन विश्व हिंदू परिषदेने केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील तमाम हिंदुंच्या मनात धर्माविषयी प्रखर आस्था निर्माण केली आणि देशभरात विकृत मनोवृत्तीच्या राजकारण्यां विरुद्ध जनतेचा आक्रोश प्रकट होऊ लागला. आजघडीला तसे शेकडो राजकारणी भ्रष्टाचार आणि इतर गुन्ह्यांमध्ये तुरुंगात तरी आहेत किंवा आरोपी म्हणून कलंकित ठरलेले आहेत. देशातील ही वैचारिक क्रांति आम्हाला एक सबळ राष्ट्र निर्माण करण्यासाठी सकारात्मकच आहे. हल्लीची न्यायासने ज्वलंत विषयावर सखोल चिंतन करून निर्णय देताना आढळतात ही हिंदुंच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. 
बदलत्या काळातील समस्यांचा आढावा घ्यायचा झाला तर असं निश्चित पणे म्हणावे लागेल की आजच्या हिंदु समाजामध्ये दोन परस्परविरोधी प्रवाह निर्माण झाले आहेत आणि ते दोन पिढ्यांना ग्रासून आहेत. एक म्हणजे पन्नास पार झालेली पिढी आणि दुसरी म्हणजे जागतिकीकरणाच्या विळख्यात सापडलेली पण आधुनिक भारताची शिल्पकार समजल्या जाणारी नुकतीच तिशीला आलेली तरूण पिढी. जुन्या पिढीने आपला धर्म आणि संस्कार स्वतः शीच मोठा संघर्ष करून जपले आहेत पण वर्तमान पिढी मात्र एक विसंगती समवेत आपल्या हिंदु असण्याची पुरस्कर्ती आहे. ही पिढी मंदिरात नियमित जाते, चतुर्थी सारखे उपवास देखील करते पण धर्म शास्त्रानुसार आचरण काही करीत नाही. अतीशय सुदृढ अशी विवाह संस्था ही हिंदु परिवार एकत्र आणि अभेद्य राहण्याची गुरुकिल्ली आहे पण दुर्दैवाने आजचा हा सुशिक्षित आणि संसाधन युक्त हिंदु तरुण वर्ग ह्या उच्च संस्थेला मारक ठरत आहे. 
सुशिक्षित मुले आणि मुली विवाह बाह्य संबंध प्रस्थापित करणं हे चुकीचे मानत नाहीत आणि त्यामुळे त्यांचे लेखी 'विवाह आणि कुटुंब' ह्या दोन्ही गोष्टी गौण ठरत चालल्या आहेत. हिंदु धर्मात घटस्फोट नावाची संकल्पना अस्तित्वात नसताना आपण मात्र वरचेवर घटस्फोटांच्या बातम्या ऐकतो,वाचतो, प्रसंगी अवतीभवती अनुभवतो देखील आहोत. ज्यांनी घटस्फोट घेतला आणि त्यांच्या घटस्फोटामुळे विस्थापित झाले ते असे सगळेच मुख्यतः आपले हिंदु धर्मीय असल्याने धर्माच्या शिकवणीला प्रचंड नुकसान होत आहे. ह्या ठिकाणी मी निर्भिडपणे असेही म्हणेन की आमच्या धर्ममार्तंडांना किंवा समाज धुरिणांना हा विषय कुठे ही चर्चिला जावा असे वाटत नाही. 
धार्मिक बाबतीत गुरू म्हणून असे अनेक लोक आपापली दुकाने लावून बसले आहेत की ज्यांना ही नवी साधन संपन्न पिढी आपले ग्राहक वाटतात आणि त्यांच्या वैयक्तिक समस्या कमाइचं साधन वाटतात. त्यांचं आत्मीयतेने उद्बोधन मात्र करावंसं वाटत नाही. अत्यंत दिमाखात असली मंडळी दर्शनी स्वरूपात संन्याशी पण वास्तवात राजभोग उपभोगत ह्या पीढीला वाकुल्या दाखवीत असतात. 
सारांश असा की तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अत्युच्च पातळीवर पोचताना आम्ही हिंदु, धार्मिक शुचितेला तिलांजली देत चाललो आहोत हे लक्षात घेऊन अविलंब कार्यरत व्हायला हवेत. दर हजार पाचशेच्या वस्ती मागे आपली समाज सभा नित्यकालिक स्वरूपात उपलब्ध व्हावी. विविध सामाजिक अथवा धार्मिक उत्सवांचे क्रियान्वयन व्हायला हवे. विवाह संस्था केवळ बळकटच नव्हे तर चिरकाल टिकेल अशी तजवीज करायला हवी. शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करून ज्ञान आणि विज्ञान यांची सांस्कृतिक दृष्टीकोनातून सांगड घातली जावी. जागोजागी तरुणांना आकर्षित करतील असे सामाजिक कार्यक्रम सतत होत रहावेत.
न्यूटन च्या नियमाप्रमाणे आमच्या मध्यकालीन चुकांमुळे संस्कृती चा ऱ्हास झाला आहे तर आताच्या चांगल्या कृतीतून पुन्हा एकदा हिंदु धर्म आणि मान्यता उंची गाठतील आणि खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनण्याची आमची वाटचाल प्रभावी ठरेल. 
धर्मो रक्षति रक्षित:| इति||
कवि'रवि'

Thursday, 27 January 2022

पांच राज्यों के चुनाव और बदलते रंग

वैसे तो हमारे देश में प्रतिवर्ष किसी न किसी इकाई के चुनाव चलते ही रहते हैं और भारत का समाचार माध्यम लगता है इसी प्रक्रिया के कारण जीवित है। अन्यथा भारतीय जर्नालिस्ट भूखे रह जाएंगे। अस्तु!
मेरे आज के लेख का मूल उद्देश्य है चुनाव के मौसम में हर दिन घटने वाली अजीबोगरीब परिस्थितियां और उनके परिप्रेक्ष्य में आम जनता का आकलन। 
एक तरफ भारत के विद्यमान प्रधानमंत्री है जो अहोरात्र भारत का विकास, भारत की सुरक्षा, भारत का वैश्विक स्तर पर महत्व तथा भारत के सामान्यातिसामान्य मानवी के जीवन स्तर में सुधार की चिंता करते हैं तो दूसरी तरफ यहां का मिडिया है जो दिन-रात जातीय समीकरणों को सामान्य मानवी के मस्तिष्क पर चिन्हित करने के अथक प्रयास में लगा रहता है। कुछ कमी रह जाती है तो कभी न खत्म होने वाली हड्डी अर्थात महंगाई का राग अलापने में कोई कसर नहीं रखता है। सबसे दुखदाई वास्तव यह है कि हम भी इन खबरों को बडे चाव से देखते-सुनते है। स्वतंत्रता के ७५ वर्ष पूर्ण होने को है और हम आज तक स्वतंत्रता इस शब्द की संज्ञा से अनभिज्ञ हैं। जात-पात का विष इतना प्रभावी निष्पन्न होता है कि हम उसके नशे में चूर देश भक्ति, देश के प्रति हमारा दायित्व तथा सामायिक उन्नति को अंधेरे में धकेल कर क्षूद्र विचारों को चिपक जाते हैं। 
७० वर्षों से चली आ रही इस घिनौनी आदत से क्या हम कभी बाज नहीं आएंगे? क्या हम कभी उन नेताओं की भर्त्सना नहीं करेंगे जो चुनाव के
आते ही गिरगिट से भी ज्यादा फूर्ति से अपने रंग बदलते है। वारांगना भी इतनी जलद गती से अपना इमान नहीं बदलती होगी जितनी गती से ये संधिसाधू-स्वार्थावलंबी-देशद्रोही-समाजद्रोही नेता बदल जाते है। 
हां, आवश्यकता है कि हम अपने आप को बिकाऊ बनने से रोकें। महज़ कुछ रुपए या उपहार के लालच में आकर हमारा शोषण करने वाले धूर्त-लालची-भ्रष्ट तथा अमानवीय व्यवहार करने वालों को चुनकर न दें। गांधी-नेहरू के बाद लालू-मुलायम और हाल के समय में राहुल-अखिलेश-सिद्धू-केजरीवाल जैसे सत्ता पिपासु आपके इर्द-गिर्द दाना लेकर घूम रहे हैं। वे भरसक कोशिश करेंगे कि आपको यह मुफ्त,वह मुफ्त कहकर उन्हें चुनाव में जिताने की गुहार लगाएंगे। लेकिन यह याद रखिए कि ये आप की ही जेब काट कर आपही को दान देने की कसरत करने वाले भेड़िए है। सन २०१४ तक हमारे देश में सत्ता पर काबिज कांग्रेस पार्टी ने लाखों करोड़ रुपयों का कर्ज दुनिया से ले रखा था जिसकी भनक तक हमें नहीं थी। मुफ्तखोरी को प्रधानता कभी मत दीजिए वरना इन नेताओं के एकाउंट तो करोड़ों अरबों डॉलर से भर जाएंगे,मगर हम दो जून रोटी को तरसते रह जाएंगे।
महाभारत में भगवान श्री कृष्ण ने अर्जुन को गीता का ज्ञान देते समय कहा था "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम। अर्थात, जब जब भी भारत में धर्म का ह्रास होगा दूसरे शब्दों में सत्य सात्विक भाव का अभाव होगा तब तब मैं पुनः पुनः इस भूमि पर अवतरित होऊंगा। क्यों न हम आज यह समझें कि हमें भाई नरेन्द्र मोदी के रूप में भगवान श्री कृष्ण का एक ऐसा निष्ठावान अनुयाई प्राप्त हुआ है जो भारत के बिगड़ते हालात को सुधारने साक्षात श्रीहरि का आशीर्वाद लेकर आया है। उसकी हर कृति से तो मुझे यही प्रतीत होता आया है कि वह एक है जो श्रीहरि के आज्ञानुसार देश को सुधारने में लगा है।
अंत में इतना ही कहना चाहूंगा कि बड़ी प्रतिक्षा के बाद हम विकास के प्रकाशमय पर्व को देख पा रहे हैं, कोई ऐसी गलती ना करें कि फिर हमारे प्रवास की दिशा हमें अनिश्चितकालीन अंधकार में धकेल दें। 
जय हिन्द वन्देमातरम भारत माता की जय कवि'रवि'

Saturday, 22 January 2022

नेताजी सुभाष चन्द्र बोस जी की जयंती

जय श्री राम, आज स्वतंत्र भारत के प्रथम संस्थापक नेताजी सुभाष चन्द्र बोस जी की जयंती है। आझाद हिंद फौज की स्थापना कर उन्होंने हिंदुस्थान के सभी लोगों को एक बहुचर्चित नारा दिया था "तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा" उनके इस आवाहन से प्रेरित होकर ब्रिटिश फौज में शामिल हजारों सैनिकों ने अपना सर्वस्व स्वतंत्रता के लिए न्यौछावर कर दिया था और निरपेक्षता से समय आया तब भूख की परवाह किए बगैर पेट को दुपट्टे से कसकर आजादी की लड़ाई लडी है वो केवल नेताजी के हृदय स्पर्शी नेतृत्व के कारण। नेताजी की सेना में स्त्रियों का भी सक्रिय योगदान रहा है। उनकी इस सेना का ऊग्र रूप देखकर तत्कालीन ब्रिटिश सरकार के होश उड़ गए थे और उन्होंने यह निश्चित मान लिया था कि अब और अधिक समय वे भारत पर शासन नहीं चला सकेंगे। किंतु स्वार्थ वश जो अंग्रेज भारत में आये थे, क्या वे इतनी आसानी से हमें आज़ादी देने वाले थे? उनके शासन काल में जो भारतीय लोगों को उन्होंने अपने वश में कर लिया था, उन्हें फितूर बना कर नेताजी के विरुद्ध षड्यंत्र करने में वे सफल रहे और यहां से भागने के पश्चात् भी उन्हीं की दी हुई सीख पर यहां के शासक चलने लगे। अर्थात अंग्रेज तो चले गए लेकिन अपनी मानस संतानें हमपर लाद गये। हम भी तब इतने भोले थे कि आज़ादी मिली ऐसा भ्रम पाल कर उन आस्तीन के सांपों को न केवल पालते रहे, उन्हें ही हमारी आज़ादी के शिल्पकार भी मान बैठे और वे फरामोश हमारा शोषण करते रहे। खैर, आज के दिन का अवसर ले कर आइये हम प्रतिज्ञा करते हैं कि अब फिर कभी हम किसी छलावे में नहीं आएंगे और अखंड भारत का निश्चय और उसे अभेद्य बनाने वाले नेताओं को ही देश की कमान सौंपेंगे। यही नेताजी सुभाष चन्द्र बोस जी को आदरभाव से वंदन होगा। जय हिन्द वन्देमातरम भारत माता की जय
कवि'रवि'

72 वहां प्रजासत्ताक दिन

श्वासों में बसी जो 'भारत माता'
स्वर्णमयी है 'भारत माता'.........१
लाखों के बलिदान हुए तब
शक्य हुआ हमें 'मुक्त चिंतन'......२
स्वतंत्रता के लिए 'हे माता'
करते रहेंगे 'रक्त सिंचन'............३
'मासूमों ने' कीया पराक्रम
रखी सदा जागृत ये 'ज्वाला'......४
भारत माता तुझे है 'अर्पण'
हम सबके 'प्राणों की माला'.......५
'एक एक युग का तू है दर्पण 
संस्कृति तेरी 'धरा का भूषण'......६
'अजर अमर' है तेरी नदियां
'सदा हरित' है विंध्य हिमाचल.....७
'राष्ट्र गान' से ऊर्जा लेकर 
'जन गण मन' हो पवित्र, प्रेमल....८
कवि 'रवि'

Wednesday, 19 January 2022

अडगळ

अनेक दशकांच्या व्यस्ततेनंतर आणि कोरोना सारख्या दीर्घकालीन महामारीच्या विळख्यातून जरा उसंत मिळाली म्हणून पैतृक गांवी जाणं शक्य झालं. तसं आता तिथं फक्त लहान भाऊ आणि त्याची पत्नी येवढाच काय तो आमचा परिवार अस्तित्व टिकवून आहे. अवघ्या गावातील सर्वात मोठा आणि गणमान्य परिवार आज तेथे आपल्या अस्तित्वाला जणू पारखा होत चाललाय. हां, नाही म्हणायला माझ्या बालपणीची मित्र मंडळी मी हा असा अचानक गांवी गेलो तरी बरोबर ओळखतात आणि मोठ्या आत्मीयतेने माझं क्षेम कुशल विचारतात ह्याचं मला विलक्षण कौतुक वाटतं. दैवदुर्विलास असा की मी मात्र त्यांच्यातील बहुतेकांचे चेहरे आणि अर्थातच नांवे देखील विसरलो आहे. ह्या वास्तवाची जाणीव झाली की मन क्षणार्धात विषण्ण होऊन माझी भर्त्सना करते. असो! 
अनेक दशकांपासून काही वस्तू घरात अगदी एक इंचही न हललेल्या बघून थोडा आश्चर्य चकित झालो आणि म्हणून मी लहान भावाला विचारता झालो की बाबा ह्या वस्तू अशाच कां पडलेल्या आहेत? क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर माझ्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावे ह्याचं द्वंद्व झळकलं पण सावरून तो म्हणाला ' अरे आप्पा अडगळच ती' काय करायचं त्याचं हाच मला प्रश्न पडतो. बरं झालं तू आलास, ह्याची काय ती विल्हेवाट लावूनच मग जा आता.
"अडगळ" हा शब्द जणू बाण होऊन माझ्या मनाला विद्ध करता झाला. सर्रकन गेल्या एक दीड वर्षाचा कोरोना कालावधी माझ्या डोळ्यासमोर तरळून गेला. आपल्या पूर्वजांनी जपलेल्या वस्तू जशा आपल्याला अडगळ ठरतात, त्याचप्रमाणे आपणही आपल्या मुलांच्या संसारातील अडगळ ठरलो आहोत की काय? ह्या विचाराने एकदम सून्न झालो. लहान्याच्या एका वाक्यात ऐहिकाचं मार्मिक सत्य दडलं होतं. तो स्वयंपाकघरात जाऊन दोघांसाठी चहा नाश्ता घेऊन आला आणि मला चिंतेत पडलेला पाहून म्हणाला 'अरे काळजी करू नकोस, आपण माणसं बोलावून ती अडगळ दूर करू', मला ठाऊक आहे तुला उचल खाचल करणं काही शक्य नाही. त्याचा एक एक शब्द मला आणखिनच अंतर्मुख करीत होता. अडगळ-अडगळ-अडगळ. मी काही बोलत नाही हे बघून तो जरा त्राग्यानेच वदला 'हे बघ आता मी सुध्दा वयस्कर झालोय' मलाही आता हा पसारा सांभाळणं कठीण झालंय. ह्या वेळी तू हे सगळं निस्तरल्या शिवाय येथून जाऊ नकोस. 
मी त्याला नकार देवू शकलो नाही. काही माणसांना बोलावून त्या अडगळीतील एक एक वस्तू मी जसजशी काढू लागलो तसतसे त्या वस्तूंशी निगडित अनेक प्रसंग चलचित्र बनून डोळ्यांसमोर तरळू लागले. त्या वस्तू जमविताना माझ्या आजी आजोबां पासून ते माझ्या आई वडील किंवा थोरल्या बहिणींपर्यंत सगळ्यांची पराकाष्ठा दिसू लागली. 
त्या सगळ्या वस्तूंची विल्हेवाट लावून तेथून परत निघालो खरा पण एक हूरहूर मात्र लागून राहिली. 'खरंच का आपणही अडगळ झालोय?' 
पुण्यास परतून घरी पोचलो खरा पण फक्त शरीराने. मन तर त्या अडगळीतील वस्तूंबरोबर त्या कबाड विकत घेणाऱ्याच्या गाडी सोबत कबाड बनून शरीराला पारखं होऊन तिथेच सुटलं होतं.
दिनचर्येत उत्साह नसल्याने घरात माझी क्षण अन् क्षण हालचाल टिपणारी माझी आजवरची सावली, माझी धर्मपत्नी थोडी साशंक झाली. दिवस संपला, निरवानिरव झाल्यावर दिवसभर सावरून ठेवलेला तीचा धीर सुटला. आणि विचारती झाली 'काय त्रास करून घेतला तिथं गांवी जाऊन'? तिच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर माझ्या जवळ नव्हतं, म्हणून मी उद्गारलो 'वेळ आल्यावर सांगीन'. काहीतरी बिनसलंय हे ओळखून तिनेही फार आग्रह धरला नाही. कालचक्राच्या क्रमानुसार तिला झोप लागली पण मी मात्र सताड डोळ्यांनी माझं मन पुण्यातील ह्या सुस्वच्छ घरातील पण गावाकडील घरात भासणाऱ्या अगदी तशाच अंधारात चाचपडत राहिलो. शरीराच्या अडगळीत मन मात्र कांही सापडत नव्हतं.......मन मात्र कांही सापडत नव्हतं.
कवि'रवि'

Tuesday, 11 January 2022

मी आणि कानटोपी

हं ...यंदाची थंडी जरा उशीराच आली आहे त्यामुळे इतर वेळी नकोशी असलेली कानटोपी कुठं दडून बसली ह्याचा शोध घेत होतो. तिला मोबाईल सारखा "मिस्स" काल देता येत नाही त्यामुळे माझी शोधाशोध सुरू होती. माझं एक वैशिष्ट्य असं की मी एखादं काम अंगावर घेतलं की मग मला इतर कशाचंच भान रहात नाही. या टोपी शोध मोहीमेचंही तसंच झालं. कपाटं उघडून शोधताना कपाटातील इतर वस्तू कपाटा बाहेर 'पारतंत्र्यातून सुटलेल्या बंडखोरां प्रमाणे' धडाधड कपाटाबाहेर उड्या मारत्या झाल्या आणि प्रयत्ना अंती परमेश्वर म्हणतात त्याप्रमाणे माझी टोपी सगळी कपाटं रिती झाल्यावर एका यकश्चित कोपऱ्यात सापडली. तीला मायेनं गोंजारत मी साफसूफ करताना तिच्या सोबत गुजगोष्टी ही झाल्यात. तिला हिरमुसली पाहून मी विचारता तीने सरळ सरळ आमच्या घर मालकिण बाईबरच तोफ डागली. माझं नशीब चांगलं की आमच्यातला संवाद फक्त आम्ही दोघेच ऐकू शकत होतो, नाहीतर तिची आणि सोबत कदाचित माझी सुद्धा रवानगी ' स्वच्छ भारतका इरादा कर लिया हमने' म्हणून कर्णकर्कश आवाज करीत येणाऱ्या त्या चतुष्पाद रथामध्ये झाली असती. 
तसं टोपी ह्या संज्ञेविषयी माझं मत भलतंच संशयी स्वरुपाचं आहे त्यामुळे मी सहजी टोपी ला बळी पडत नाही परंतु असतात असेही काही प्रसंग जिथे टोपी आपल्या डोक्यावर बसतेच बसते. नुसती बसतेच असं नाही तर तिचा सांभाळ वजा लाड ही करायला लावते. ती आपली अगतिकता असते हे सत्य आहे. कानटोपी चं मात्र तसं नाही, ही पहिल्या प्रेमाच्या आठवणीं सारखी डोक्याला घट्ट चिकटून बसते आणि काही वेळा नंतर त्या आठवणीं प्रमाणेच असह्य होऊन काढून फेकून दिली जाते. असो कितीही प्रयत्न केला तरी ती हिवाळा भर आपली साथ मात्र सोडत नाही. 
जन्मोजन्मी च्या आणाभाका न घेताही ही इतक्या निस्सीम पणे आपली साथ कां बरे देत असावी हा अनुत्तरित प्रश्न घेऊनच कदाचित मी किंवा माझ्या प्रश्नाचं कस्पट करून ती इहलोकीची यात्रा संपवीन.
कवि 'रवि'

परसातील फुले

कळ्या असतात तोवर ती
मातेच्या उदरात जणू असतात
उमलल्या वर मात्र त्यांना 
'वर्ण' असे फुटतात
झाडावर थांबलेलं 
जाते देवाच्या गळ्यात थेट
सड्यामध्ये पोचलेली मात्र
पायदळी तुडवली जातात
कुणा कुणाला भोगावी लागते
'हारा'च्या कैदेची शिक्षा
तयांच्या आयुष्याला क्षणभराचीच भिक्षा
पांढऱ्या कपड्यातील काळ्या मनाचं
स्वागत करताना ते विद्ध ही होतात
हारात गोवला गेला तरी
त्याची ती 'हार'च असते
नियतीने दिलेल्या सौंदर्यावर ही
नियतीची 'मार'च असते
परसातील आणि हारातील फुलांना
सुगंध जरी एकच असतो
त्यांच्या जगण्याचा स्तर मात्र
समाजात एक सारखा नसतो
देवा तुझ्या सृष्टीतील इतर जीव खरेच सुखी
फुले आणि माणसं मात्र कायमच दु:खी
फुले आणि माणसं मात्र कायमच दु:खी
कवि'रवि'

मकर संक्रांति बौद्धिक

जय श्री राम
श्रीराम प्रभात शाखा के आज के इस मकर संक्रांति पर्व के उपलक्ष्य में आयोजित ऑनलाइन कार्यक्रम में बौद्धिक का दायित्व मुझे सौंपा गया है। सभी स्वयंसेवकों को मैं बताना चाहता हूं कि मेरा यह पहला ही अवसर और प्रयास है कि मैं संघ के किसी कार्यक्रम में बौद्धिक ले सकूं। आशा है आप तृटियों के साथ इसे स्वीकार करेंगे।
सनातन भारतीय संस्कृति की परम्पराओं का विशेष यह है कि इनकी बहुतांश विधी निसर्ग के आयामों के साथ निगडित है। पौष मास में आनेवाला मकर संक्रांति का पर्व भी ज्ञान विज्ञान के दृष्टिकोण से महत्वपूर्ण है और संपूर्ण आर्यावर्त में भरतखण्ड में इसकी महत्ता अबाधित है। समूचे भारत में मनाया जाने वाला यह पर्व दस विभिन्न नामों से प्रचलित है। दक्षिण में इसे ताई पोंगल और उझवर तिरुनल, पंजाब में लोहड़ी,तथा पूर्वोत्तर राज्यों में बिहू कहा जाता है। गुजरात में इस त्यौहार को उत्तरायण तो उत्तर प्रदेश तथा बिहार में खिचड़ी के नाम से जाना जाता है। इस पर्व को पश्चिम बंगाल में पौष संक्रांति के नाम से पहचाना जाता है।मान्यता है कि मकर संक्रान्ति के दिन ही गंगा जी भगीरथ के पीछे चलकर कपिल मुनि के आश्रम से होकर सागर में जा मिली थीं। उसी के प्रतीक स्वरूप यहां हर साल गंगासागर में स्नान-दान के लिये वर्ष में केवल एक दिन मकर संक्रान्ति पर लोगों की अपार भीड़ जुटती है। इसीलिए कहते हैं "सारे तीरथ बार बार, गंगा सागर एक बार।"
महाराष्ट्र में इस दिन को मकर संक्रांति ही कहा जाता है। इस दिन वे सभी विवाहित महिलायें जिनके विवाह के बाद ये पर्व पहली बार होता है कपास, तेल व नमक आदि चीजें दूसरी सुहागिन महिलाओं को दान करती हैं। इस दिन तिल गूल के हलवे को बांटने की प्रथा भी है। मिट्टी के कुंभ दान का भी प्रचलन है। एक दूसरे को तिल गुड़ देते हुए बोलते हैं "तिळ गूळ घ्या आणि गोड़ गोड़ बोला" अर्थात तिल गुड़ लो और मीठा मीठा बोलो । इसके अलावा  छत्तीसगढ़, गोआ, ओड़ीसा, हरियाणा, बिहार के कुछ भाग, झारखण्ड, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक के कुछ भाग, केरल, मध्य प्रदेश,  मणिपुर, राजस्थान, सिक्किम, उत्तर प्रदेश के कुछ भाग, उत्तराखण्ड, पश्चिम बंगाल, और जम्मू में भी इसे मकर संक्रांति के नाम से ही मनाते हैं।उत्तर प्रदेश में यह मुख्य रूप से 'दान का पर्व' है। इस अवसर पर इलाहाबाद में संगम पर एक माह तक चलने वाले माघ मेले की भी शुरूआत हो जाती है। 14 जनवरी से ही इलाहाबाद में हर साल माघ मेले की शुरुआत होती है। एेसी भी मान्यता है कि 14 जनवरी यानी मकर संक्रान्ति से पृथ्वी पर अच्छे दिनों की शुरुआत होती है। इस अवसर पर गंगा सहित कर्इ पवित्र नदियों के तट पर मेले लगते है। समूचे उत्तर प्रदेश में इस व्रत को खिचड़ी के नाम से जाना जाता है तथा इस दिन खिचड़ी खाने आैर दान देने का अत्यधिक महत्व होता है। इसके साथ ही बिहार में भी मकर संक्रान्ति को खिचड़ी नाम से जाना जाता हैं। इस दिन उड़द, चावल, तिल, चिवड़ा, गौ, स्वर्ण, ऊनी वस्त्र, कम्बल आदि दान करने का महत्व होता है।खास बात ये है कि मकर संक्राति के विभिन्न नाम राज्यों के हिसाब से बंटा है।  मकर संक्रांति ये नाम छत्तीसगढ़, गोआ, ओडिशा, हरियाणा, बिहार, झारखण्ड, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, केरल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपुर, राजस्थान, सिक्किम, उत्तर प्रदेश, उत्तराखण्ड, पश्चिम बंगाल, और जम्मू में चलन में है।  वहीं पंजाब में इसे लोहड़ी नाम से एक दिन पहले 13 तारीख को ही मना लिया जाता है। 
तमिलनाडु में पोंगल के रूप में मकर संक्रांति चार दिन तक मनाते हैं। पहले दिन भोगी-पोंगल, दूसरे दिन सूर्य-पोंगल, तीसरे दिन मट्टू-पोंगल या केनू-पोंगल आखीर में चौथे आैर अन्तिम दिन कन्या-पोंगल। इसमें पहले दिन कूड़ा इकठ्ठा कर जलाया जाता है, दूसरे दिन लक्ष्मी जी की पूजा की जाती है और तीसरे दिन पशु धन की पूजा की जाती है। इस के बाद चौथे दिन स्नान करके खुले आंगन में मिट्टी के बर्तन में खीर बनायी जाती है, जिसे पोंगल कहते हैं। इसका सूर्य देव को भोग लगाया जाता है, जिसे प्रसाद के रूप में सभी ग्रहण करते हैं। इस दिन बेटी और जमाई राजा को विशेष रूप से न्यौता दिया जाता है, इसीलिए ये दिन कन्या पोंगल कहलाता है। तमिलनाडु में कुछ स्थानों पर इसे उझवर तिरुनल भी कहते हैं। 
भारत के पूर्वोत्तर राज्य असम में मकर संक्रान्ति को माघ बिहू या भोगाली बिहू के नाम से मनाया जाता है। इस समय असम में तिल, चावल, नारियल और गन्ने की फसल होती है। इसी की खुशी में इन चीजों से बने व्यंजन और पकवान बनाकर खाये और खिलाये जाते हैं। भोगाली बिहू पर होलिका भी जलाई जाती है और तिल व नारियल से बनाए व्यंजन अग्नि देवता को समर्पित किए जाते हैं। इस मौके पर टेकेली भोंगा नामक खेल खेला जाता है साथ ही भैंसों की लड़ाई भी होती है।
गुजरात में इस पर्व को उत्तरायण नाम से मनाया जाता है। नई फसल और ऋतु के स्वागत का ये त्योहार 14 और 15 जनवरी को मनाया जाता है। इस मौके पर गुजरात में पतंग उड़ाने की परंपरा है। इस दिन उत्तरायण का व्रत भी रखा जाता है और तिल व मूंगफली दाने की चक्की बनाई जाती है।
मकर संक्रांति को एक अन्य नाम मकर संक्रमण से भी बुलाते हैं। ये नाम कर्नाटक में प्रचलित है। हांलाकि बाकी सभी परंपरायें सामान्य रूप से वही हैं।
हांलाकि जम्मू में अधिकांश लोग इस पर्व को मकर संक्रांति के नाम से ही मनाते हैं परंतु कश्मीर घाटी के अनेक स्थानों पर इसे शिशुर सेंक्रात नाम से भी जाना जाता है। इसी तरह हरियाणा, हिमाचल प्रदेश, आैर पंजाब के कुछ हिस्सों में इस पर्व को माघी भी कहा जाता है।
आइये जानते हैं मकर संक्रांति का वैज्ञानिक महत्व:
मकर संक्रांति के दिनों में नदियों में बाष्पन क्रिया होती है, इसमें तमाम तरह के रोग निवारण हो सकते हैं। इसलिए नदी में स्नान तथा सूर्य को अर्घ्य दान करने का इन दिनों में विशेष महत्व है। संक्रांति के समय में ठंड का मौसम रहता है, इन दिनों तिल और गुड़ का सेवन शरीर को ऊर्जा तथा त्वचा को स्निग्धा प्रदान करने में लाभकारी है यह विज्ञान में सुनिश्चित हुआ है। इस दिन खिचड़ी खाने को भी वैज्ञानिक आधार है, खिचड़ी पाचन को दुरुस्त रखती है। अदरक और मटर मिलाकर बनाई गई खिचड़ी रोग प्रतिकारकता बढाती है। जिससे विभिन्न जीव-जंतुओं से मुक्त रहा जा सकता है। शास्त्रों के अनुसार प्रकाशमय वातावरण में शरीर त्याग करने पर मनुष्य पुनः जन्म नहीं लेता है, जबकि अंधकार में मृत्यु को प्राप्त करने पर पुनर्जन्म लेता है। ज्ञात रहे कि प्रकाश एवं अंधकार यह दोनों उत्तरायण और दक्षिणायन के प्रतिरूप है। सूर्य के उत्तरायण के प्रतिक्षा में ही महा तपस्वी भीष्म ने अपने प्राण तब तक नहीं छोडे जब-तक मकर संक्रांति का पुण्यकाल प्रारंभ नहीं हुआ। सूर्य के उत्तरायण का महत्व छांदोग्य उपनिषद् में भी विदित है।
पुराणों में तथा विज्ञान दोनों में सूर्य के उत्तरायण का महत्व उद्धरित किया गया है। सूर्य के उत्तरायण होने पर दिन का समय बडा होता है, मनुष्य की कार्यशक्ति बढी हुई होती है, परिणामत: मनुष्य प्रगति की ओर अग्रसर होता है। प्रकाश में वृद्धि के कारण मनुष्य में शक्ति भी वृद्धिंगत होती है।
आइये सनातन संस्कृति के धर्म आयामों को हम परंपराओं के साथ साथ वैज्ञानिक दृष्टिकोण से भी समझें और हर्षोल्लास से सपरिवार ईष्ट मित्रों के साथ इस तरह मनाएं कि इस आधुनिक युग में समूचे विश्व को मंगल संदेश प्राप्त हो।
अभी तक हमने जो कुछ भी सुना, वह पारंपरिक उत्सव तथा उसके चीरस्थायी मुल्यों के बारे में था। आइये अब हम एक प्रयास यह करते हैं कि इन त्यौहारों का आधुनिक मानवी जीवन पद्धति से सरोकार कैसा है। 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के संस्थापक परम पूजनीय डॉ केशव बलिराम हेडगेवार जी ने संघ का प्राकृतिक उद्देश्य विदित किया है, वो है राष्ट्र भक्ति, राष्ट्र के प्रति एकात्म भाव और संवेदना। हमारे उत्सव इस एकात्म भाव को पूरक हैं और यही कारण है कि वे आज तक अबाधित है। देश को तथाकथित स्वतंत्रता प्राप्ति के बाद वैश्विक आधुनिकीकरण का प्रभाव भारतीय समाज पर भी पड़ा है। परंतु हमारी परंपराओं का अस्तित्व इन त्यौहारों की वजह से दृगोचर है। सामाजिक समरसता यह जो संघ का मूलमंत्र है उसे ऐसे त्यौहार शक्ति भी देते हैं और हिंदुओं में एकत्व की भावना को भी दृढ़ करते हैं।
परम पूजनीय श्रीमान गोलवलकर गुरूजी तथा परम पूजनीय बालासाहेब देवरस जी की संघ के विषय में प्रसारित अनेकों साहित्य कृतियों से यह स्पष्ट होता है कि पूर्वापार चली आ रही कुप्रथाओं के कारण सशक्त हिंदु समाज का गठन नहीं हो पाया है और इसलिए संघ शक्ति का मूल तत्व ही उन्होंने सामाजिक समरसता निश्चित किया है। पूजनीय सरसंघचालक मोहनराव भागवत भी अपने विचार प्रदर्शित करते समय एकात्म भाव को बल देते हैं। उनका दृष्टिकोण तो इतना व्यापक है कि वे बड़ी स्पष्टता से हमें अवगत कराते हैं कि संपूर्ण भरतखण्ड में बसने वाले मानवी एक ही संस्कृति के वंशज हैं और उन्हें चाहे कोई कितना ही तोड़ने की कोशिश करें, वे भिन्न नहीं ठहराये जा सकते हैं। जब हमारे पूजनीय सरसंघचालक हमें यह विचार देते हैं तो उसकी व्यापकता धर्म विहीन, जाति विहीन भारतीय समाज को प्रतिपादित करती हैं। तो हमारा संघ स्वयंसेवकों का आद्य कर्तव्य बनता है कि हम अपनी विचार प्रणाली से इस उद्देश्य को समाज के अंतिम व्यक्ति तक पहुंचाएं और वैश्विक एकात्मता की नींव पुख्ता करने में सहयोग करें। 
तील और गुड़ मिलकर जो मिठास और स्वास्थ्य वर्धक गुणविशेष प्रकट करते हैं, आइये हम भी अपनी जीवनशैली और संघ संस्कारों को मिला कर एक अभेद्य भारतीय समाज, राष्ट्र हित को अपना परिधान बनाकर विश्व में शांति प्रियता की मिठास प्रदान करने वाला मानवी समूह बनने का संकल्प लें। 
सर्वेपि सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामया
सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दु:ख भाग्भवेत।
पुनः एक बार मैं आप सभी महानुभावों को मकर संक्रांति के पावन पर्व पर हार्दिक शुभकामनाएं देता हूं और आप के उत्तम स्वास्थ्य की कामना करता हूं। 
जय श्री राम

Wednesday, 5 January 2022

सिंधुताई सपकाळ

तप्त लाव्हा प्राशुनी ती ताठ बनली दुष्टांसमोर
माई म्हणुनी जगती झाली रंजल्या गांजल्यां समोर
विद्ध ते काळीज परि संवेदना पिडितांप्रति
सिंधु नामे जन्मली जणू सिंधु अनाथांच्या प्रति
ध्येय निष्ठूर वागणे जगवून गेले गे तुला
माई तुझिया अंतरीच्या वात्सल्य पूरक त्या कळा
रत्ने जेवढी जन्मली ह्या वत्सल भूमी वरी
मध्ये तयांच्या तू एक अनोखी असशी परि
करुनीया सादर नमन देतसे श्रद्धांजली
जोडताना हात तुजला आर्द्र बघ ही ओंजळी
😭😭😭
कवि'रवि'