Monday, 31 July 2023

लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्य समर

वर्ष १८५६ दिनांक २३ जुलै स्थळ रत्नागिरी, भारताच्या स्वातंत्र्य समरामध्ये आपल्या सर्वस्वाची आहुति देण्याकरिता आणखी एक स्फुल्लिंग जन्माला आले ज्याचे नामाभिधान केशव असे ठेवण्यात आले आणि पुढील काळात त्यांची ख्याती स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्या नांवे प्रसिद्ध झाली. इंग्रजी सत्तेला सुरुंग लावण्यासाठी त्याकाळी जे प्रमुख नेतृत्व कार्यरत होते, त्या सर्वांना बहुतेक प्रसंगी लोकमान्यांच्या विचारांनी स्फूर्ती प्राप्त होत असे. तत्कालीन कॉंग्रेस पक्ष असो किंवा क्रांतिकारक समूह असोत प्रत्येकाचा टिळकांशी संबंध होता. कॉंग्रेसी राजकारणात 'जहाल मतवादी' म्हणून त्यांची ख्याती होती आणि इंग्रजी मखलाशी ला सपशेल पाडून "संपूर्ण स्वराज्य" अशी मागणी करणारे एकमेव नेतृत्व ठरलेले टिळक परिणामतः तुरुंगात जावून पडले. 
लोकमान्य टिळकांनी लिहिलेली पुस्तके अनुक्रमे
ओरियन
आर्क्टिक होम इन द वेदाज
गीता रहस्य, 
इत्यादि केवळ वाचनीय नाहीत तर अभ्यासनीय आणि तदनुषंगे अनुकरणीय देखील आहेत. 
ज्वलंत विचार, निर्भिड प्रवृत्ती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा मनापासून अंगिकार करून विषय हाताळण्याची किमया आणि सर्व समावेशक नेतृत्व हे त्यांचे अंगभूत गुण इंग्रजी सत्तेला भूकंप सदृश हादरे देण्यात सक्षम होते.
१ ऑगस्ट १९२० रोजी वयाच्या ६४ वर्षांच्या आपल्या आयुष्याला पूर्ण विराम देऊन खऱ्याअर्थाने स्वातंत्र्य समरामध्ये आपल्या अंतिम श्वासाची आहुति देऊन त्यांनी अढळपदाकडे गमन केले.
सनातन काळापासून ज्या ज्या महारथ्यांनी हे राष्ट्र अबाधित रहावे ह्यासाठी सर्वस्व पणाला लावले अशांमध्ये केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक यांचा उल्लेख केल्याशिवाय भारताचा इतिहास अपूर्ण राहील.
आजच्या दिवशी त्यांचं पुण्यस्मरण करून त्यांना विनम्र भावाने श्रद्धांजली अर्पण करुयात.
🙏🙏🙏
रविंद्र सरदेशमुख


Saturday, 29 July 2023

राम राम भौ

काल यूटूप वर पाह्यलं का भौ आपल्या शरदभौ पेंडसे ह्यायची पोरगी म्हनं पायलट झाली. इमान चालोनारी पायलट. हां हां तश्शीच पायलट. 
तं मंग झाली पायलट तं व्हवू द्या. आपल्याच्यानं झालं तं कौतुकच कराव आन न्हाईच जमलं तं गप गुमान ऱ्हावाव. काहून का भौ आपल्या लेकरांचं कौतुक आपल्यालेबीन आसतेच ना भौ. मंग तसं ते शरद पोंक्षे जी ले अशीन तं कोनाची दुख्याचं काई काम हाये का भौ. पन न्हाई अठी तं पायलीले पन्नास रिकामटेकडे निरा बकवास कऱ्याले पडेल असतातच राजे हो.
तं ह्या बकवास महर्ष्याईनं लगीच पोकळ बाश्यातून बोंबाबोंब लावली ना भौ जोऱ्यानं. 
म्हनं काय तं शरद भौ नं आपली पोरगी आरक्षन न घेता पास झाली असं बोल्याले नाई पायजे. 
मी म्हंतो काहून बॉ? त्या भल्या मानसाच्या भल्या लेकीनं बापाच्या मेहनतीचं चीज केलं तवा त्याले खुशी तं व्हईनच! मंग तीले मोठं कऱ्यासाठी त्यानं काय खस्ता खाल्ल्या, त्याले काय तरास झाला थे बीन तो सांगते तं समजून घ्या लागीन कानि भौ? मंग तोंडं इचकावनाऱ्याईची ऐशी तैशी कऱ्याची जिम्मेदारी आपल्याले घ्या लागीन हे बी जरूरी हाये. तवा मी म्हंतो ह्या भामट्याईले त्याईच्याच भाषीत इतलं बुकलून काढाव का ह्याईच्या मालकानं ह्याईचा भाकरतुकडा बंद केला पायजे.
चला भौ भेटू पुन्ना 'रामराम'
कवि 'रवि'

Thursday, 27 July 2023

मैं इकबार जी लूं

मैं इकबार जी लूं ऐ वक्त ऐ सितमगर
ज़मीं ना सही आसमां को ही छू लूं

के इन्सां की बस्ती में हारा हुआ हूं
वहां अपने अरमां की जन्नत ही पा लूं
मैं इकबार जी लूं.........

वो लम्हे जो हमने पाले जिगर में
रही मुश्किलें तो कहां तक सम्हालूं
मैं इकबार जी लूं........

लफ़्ज़ों को तासीर देता है कब-तक
'रवि' बस दुआ कर खुदा तुझ को पा लूं
मैं इकबार जी लूं.....

कवि 'रवि'



Tuesday, 25 July 2023

गर्दिशे आसमां

ना जाने क्यों कभी एहसास होता है
के आसमां पे बादलों का असर खास होता है
चढ़े दिन में धुंधलका छा जाता है 
राहें सुनसान, बारिश का मंज़र खास होता है

झमाझम बरसता पानी और दिल बेकाबू
उसके पास आने का भरम खास होता है

गर्म चाय की प्याली और कानों में तरन्नुम
दिले बागबां खुशनुमा अलबत्ता खास होता है

वो आती है तो दर साल मुहब्बत साथ लाती है
उसके आने का अंदाज भी बहुत खास होता है

धरा पर मौजूद हर शय को है उसका इंतज़ार
'रवि' तेरे अंदाज़े बयां का हुनर खास होता है

कवि 'रवि'

Sunday, 23 July 2023

पाऊले चालती

पाऊले चालती पंढरीची वाट
चारी ठाव खाऊनी जेंव्हा भरलेसे पोट
पाऊले चालती.....

आप्त ईष्ट आणि अवतीभोवती चे
सांगाती बैसोनी जेंव्हा दाखवीती खोट
पाऊले चालती.....

बायकोची पोपटपंची दु:ख देई भारी
तेंव्हा त्या कैवाऱ्याला आळवीती ओठ
पाऊले चालती......

म्हणे 'रवि' ऐका सारे आपुल्या मनाचे
पांडुरंगा चरणीं देखा अमृताचा घट
पाऊले चालती पंढरीची वाट
पाऊले चालती पंढरीची वाट

कवि 'रवि'

Saturday, 22 July 2023

दृष्टांत

आज पुनः प्रत्यक्ष मिला हूं
परमपिता परमेश्वर से
नित नित सांसे देती मुझको
मां धरती और अंबर से

अतीव श्रम से जो उपजाते
धान अनाज अपने खेतों में
गोपाल कन्हैया को भी रिझाते
अपने घर के आंगन में
जन जीवन को स्वस्थ्य बनाते
वन उपजों के माध्यम से
आज पुनः प्रत्यक्ष मिला हूं 
परमपिता परमेश्वर से

ज्ञान और विज्ञान सभी को
विद्यालय में जो सिखलाते
शौर्य और वीरता दृगोचर
नवयौवन को दृष्टि देते
विना किसी लालच के हमको
प्रेम स्नेह और शिक्षा देते
जीवन हमारा जिनके श्रम से
सुदृढ़ बना हर माध्यम से
आज पुनः प्रत्यक्ष मिला हूं 
परमपिता परमेश्वर से

अंतरिक्ष पाताल और भूतल
ज्ञान भरा भंडार सभी है
बहुत सा हम ने खोजा है पर
बहुत अनेक खोजना अभी है
ऐसा विश्व विलोभन सब है
जिसके कृपा अभिभावन से
आज पुनः प्रत्यक्ष मिला हूं 
परमपिता परमेश्वर से

कवि'रवि' 

Friday, 21 July 2023

आईना हूं क्या करूं

लोग आते रूबरू ,क्या करूं
चाहते मेरी नहीं पर,आईना हूं क्या करूं

कोई संतों में है शामिल
कोई है खानाबदोश
कोई धोखेबाज अव्वल 
मजबूर कोई क्या करूं 

आईने की शक्लो सूरत
आप ही है हूबहू
देखते है आप खुदको
मैं नहीं वो क्या करूं

सोचकर ही पेश आओ
जब भी आओ सामने
 शक्ल से औकात दिखती
देखता मैं क्या करूं

एक तू इन्सान के
वाकिफे फितरत ऐ 'रवि'
मैं तेरी तसवीर और तू
आईना मेरा क्या करूं 

कवि 'रवि'
 

Tuesday, 18 July 2023

रामराम भौ

जय श्रीराम जी,
झाली भौ आज मोदी हटाव वाल्याइची खलबत सभा बंगळूरात झाली आन मोदी चलाव वाल्याइची संगनमत सभा दिल्लीत झाली.
तठी दिल्लीम्दी साऱ्याइनं दिलजमाई चा भरोसा दाखोला. इकळे बंगळूरात मातर जांगडगुत्ता फसल्यावानी दिसत व्हता भौ. बातम्या पायल्यावर समजलं का ह्या पिलंपोह्याइची मोयी बांध्याले फुळे निंघले व्हते ते नितिशभौ, लालूभौ म्हणं तठून पायटूनच जय रामजी की करून निंघून गेले. खलबतखान्यात गलबताची सांगड काई जमली नाई दिसते भौ. ह्या 'उपिए' ले म्हनं नवं नाव देल्लं 'इंडिया' . आता सांगा तुमाले हे चोखट लागीन काय भौ? मले मालूम हाये कां तुमी नायीच म्हनसान. हौ ना राजे हो इंडिया म्हतल्यावर कसं एकदिलानं काम कराची भावना मनामंदी येते कानी भौ? पन ह्या उपिए वाल्याइनं कवातरी एखांद्या वक्ती एकी दाखोली कां भौ? 
हे सारे जत्रीत आल्यावानी, हौश्या-गवश्या- नवश्या वानी एका जागी येतात आन आपापली तुंबडी संभाळत संभाळत वापस जातात. आता भौ तुंबडीत काई पळ्ळं नशीन तं दवडीत कसं दिशीन! हाये कानी भौ? 
मी तं म्हंतो भौ औंदाच्या निवळनुकाईच्या पयले तमाम माह्या माय माऊल्याईनं नियमच कराव कां ऐऱ्या गैऱ्याइले घरचा जो कोन मतदान करीन त्याची भाकर तोच बनून खाईन. सादा शिंपल बहिष्कार माय माऊल्याईचा पन मोठ्या हत्यारावानी काम करीन भौ, मले खात्री हाये भौ.
चला परयत्न करू आपल्याले जमीन तितला समाजमन तयार कऱ्याचा, बाकी सारं रामाच्या हवाली भौ. रामराम!
कवि 'रवि'

Sunday, 16 July 2023

शह आणि मात

जय श्रीराम,
काल अर्थात दिनांक १६/०७/२०२३ रोजी दिवस काका पुतण्या मधील भेटीच्या वार्तेने गाजला. १५ मिनिटांचा प्रसंग भारत भरातल्या बातमीदार समाजाला उत्तम मेजवानी देऊन गेला. आजकाल एक बरं आहे, मुद्रित माध्यमे आणि दृश्य माध्यमे यांच्या व्यतिरिक्त समाज माध्यमांची रेलचेल असल्याने एका बातमीला शेकडो कंगोरे शोधून त्यांचं विश्लेषण जो तो आपापल्या परीने करतो किंबहुना ते रंजक किंवा मसालेदार बनवून प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सारख्या तथाकथित चिंतकांना मग गहन अभ्यासकाच्या भुमिकेत शिरून त्यावर खल करीत बसणे सहज सोपे होते. 
काल जे काही घडले त्यातून असा सूर काढण्यात आला की काका आणि पुतण्या यांच्या मध्ये दिलजमाई घडवून आणण्यासाठी दस्तुरखुद्द सुप्रिया ताईने पुढाकार घेऊन दादाला आमंत्रण घातले आणि यशवंतराव चव्हाण स्मृती केंद्राचे स्थळ निश्चित केले. आता ताईचीच मध्यस्थी म्हंटल्यावर दादा तरी कसे नाकारू शकणार? झाले दादांनी देखील एकदम वारं शिरलेल्या वारू सारखी अवघ्या मदतनिसांचा ताफा घेऊन तिकडे धाव घेतली. काकांना म्हणे आश्चर्य चकित करण्यासाठी त्यांची वेळ न मागताच भेट घेतली. काय ते प्रेमाचं भरतं आणि काय तो मेलमिलाफ! सगळं कसं एकदम ओके.
झाली ऐतिहासिक क्षणाची निर्मिती झाली, भोंगे वाजवत आलेल्या गाड्या भोंगे वाजवत परतल्या! मागे राहिल्या त्या आठवणी आणि त्या अनुषंगाने जनित झालेले कवित्व.
मित्रांनो, बातमी म्हणावी तर खूप साधी, म्हणावी तर राजकारणाच्या दृष्टीने गोंधळ निर्माण करणारी अशी जाणवत राहिली. पण खरंच तसं होतं काय? मला आकलन झाले ते असे!.
ज्या दिवशी अजित दादा बंड करून पक्ष घेऊन पळाले त्या दिवशी पासून काकांना आपली जाणते पणाची स्व साक्षांकित पदवी मिरविणे असह्य झाले. अरे! येवढा कसा काय मी अडाणी ठरलो की मला असे काही घडेल याची पुसटशी कल्पना आली नाही? आणि त्या अजाणतेपणाची भावना काकांना अस्वस्थ करून गेली, असा शह राजकारणाच्या सारीपाटावर केवळ आपणच देऊ शकतो हा भ्रम क्षणात ध्वस्त झाला. परंतु, इतिहासातील अनेक सदृश पात्रांप्रमाणे काकांच्या देखील मनाची अवस्था झाली आणि ते दादाच्या ह्या खेळीला मात देण्यासाठी लगोलग कामाला लागले. जागोजागी सभा आयोजित करून जनसंपर्क करायचा, आपल्या तळागाळातील मतदार कार्यकर्ते ह्यांना भावनिक साद घालायची आणि पुन्हा एकदा मीच 'श्रेष्ठ ' हे सिद्ध करायचे असा बाणेदार हेतू घेऊन काकांची भरारी सुरू झाली. तिकडे काकांच्या ह्या पवित्र्यामुळे आता दादांचा खेळ खल्लास असे सगळ्यांना म्हणजे पत्रकारांना वाटत असतानाच दादांनी आपल्या वक्तव्यातून एक इशारा दिला की, तुम्ही विरोधी सूर लावून मला जनतेच्या नजरेत पाडण्याचा प्रयत्न करणार असाल तर मला सुद्धा तशाच स्वरूपात उत्तर द्यावे लागेल आणि मग तुम्हाला आणखीनच क्लेश सहन करावा लागेल. आपले शस्त्र आपल्यावर बूमरॅंग होऊन प्रतिघात करू शकते हे वास्तव काही जाणत्या राजाच्या ध्यानी आले नाही ही वृद्धत्वाची किमया म्हणावी की झाकून ठेवलेल्या कोंबड्याने आपलं अस्तित्व उघडं पाडलं म्हणावं हे विचारणीय आहे.
असो सारांश असा की काकांनी उभ्या आयुष्यात केवळ आणि केवळ स्वार्थी राजकारण केले, जे काही अवती भवती पेरले तेच पिकले आणि त्या पद्धतीचे पीक काकांच्या पदरी पडले. दु:ख करावे असे कितीही वाटले तरी निसर्गाच्या न्यायालयात अपील नसते. फैसला एकदाच असतो आणि तो काकांच्या आयुष्यात या क्षणीं झालाय. 
कालच्या चुलत्या पुतण्याच्या भेटीचे सार हेच की पुतण्याने काकांची पुरती वाट लावली आहे, त्यांच्याच शैलीत धक्कातंत्र वापरण्याची हातोटी बेमालूमपणे साध्य केली आहे आणि तेल लावलेल्या पैलवानाला डायरेक्ट चीतपट केले आहे. 
 ह्या पुढे आणखी काही उपद्व्याप न करता शरपंजरी वर आसनस्थ झालेल्या ह्या आधुनिक भीष्माने आता उत्तरायणाची वाट बघावी हेच सयुक्तिक ठरेल.
रविंद्र सरदेशमुख 




Thursday, 13 July 2023

राजकारणाची दशा आणि दिशा

सध्या देशभरातील डावे उजवे किंवा आणखी कोणत्याही श्रेणीत मोडणारे परंतु सत्तेपासून वंचित असलेले पक्ष एकत्रित पणे सत्ता हस्तगत करण्यासाठी यथा संभव प्रयत्न करीत आहेत. आपला देश हा अनेक कारणांनी जगातील इतर देश किंवा राजकारणी ह्यांना अनुकरणीय पायंडे घालून देण्यासाठी प्रसिद्ध होता. आणि म्हणूनच स्वातंत्र्य प्राप्ती साठी जगातील सर्व लोकांनी भारतीय आदर्शाचा अवलंब केला. ७०-८० वर्षांच्या काळात आम्ही विकासाचा उद्देश बाळगून लोकशाही मार्गाने सरकारे निवडून देतो आहोत. त्यामुळे आमचा प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे. गेल्या १० वर्षात पुरोगामी लोकशाही आघाडी किंवा 'एन डी ए', जी भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने यशस्वी वाटचाल करीत आहे आणि देशाचा विकासरुपी रथ जगाने वाखाणावा अशा अत्यंत सकारात्मक पद्धतीने चालवीत आहे. ह्या आघाडीच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे हे जनता ओळखून आहे आणि त्यामुळे सरकार देखील महत्वाकांक्षी पाऊले उचलीत आहे. ह्या जवळपास दशकभरात एक बाब निश्चितच सिद्ध झाली आहे की भ्रष्टाचारावर नियंत्रण आणले तर देशाचा विकास निखालसपणे साधता येतो. पुढील आणखी काही वर्षांत पुरोगामी लोकशाही आघाडीचे हे सरकार देशाला जगातील अव्वल देश म्हणून ख्याती प्राप्त करून देतील असे चित्र प्रखरपणे जाणवू लागले आहे. 
हे असे जर चालले तर आपले काय होणार! ह्या भयगंडाने पछाडलेले आणि अर्थातच भ्रष्ट प्रवृत्ती च्या नेतृत्वामुळे आजचे विरोधी पक्ष आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. राजकारणात अकल्पनीय अशी भाबडी गणिते मांडून ही मूर्ख नेते मंडळी आपले समाधान करून घेऊ शकतील. पण जनतेला गणिताच्या आकड्यांप्रमाणे समजणे ही घोडचूक आहे हे लक्षात घेत नाहीत.
भाजपा देशातील ४० टक्के जनतेच्या मनातील पक्ष ठरला आहे आणि उर्वरित ६० टक्के जनता इतर विरोधी पक्षांच्या बाजूने मतदान करते म्हणून आपण एकत्र यावे आणि सत्ता हिसकावुन घ्यावी अशी सोपी निती, विरोधी पक्षनेते लावून धरत आहेत.
मला येथे नेमका हाच मुद्दा मांडून जनतेला प्रश्न विचारावासा वाटतो की काय ६० टक्के जनता हे समीकरण मान्य करते? तसे असेल तर पुन्हा निवडणूकीची वाट बघण्याचे कारण काय? 
पी आय एल दाखल करा सुप्रीम कोर्टाला ह्या गणितान्वये निकाल लावू द्या आणि घ्या सरकारच्या चाव्या. आणि जर ते शक्य नाही, साध्य नाही तर मग ही फालतुगिरी बंद करून जनतेला मूर्ख समजण्याची प्रवृत्ती त्यागा.
अमेरिके मध्ये जवळपास द्विपक्षीय लढती होतात आणि कोणताही एक पक्ष ( मोटी शिवाय) बहुमताने सत्तेत असतो. आणि तरीही तेथील जनतेचे धृवीकरण कोणत्याही एका पक्षाला करणे जमलेले नाही. विकासात्मक वाटचाल आणि सुशासन ह्या प्रमुख बाबींचा परामर्श घेवूनच जनता आपल्या पसंतीचा पक्ष सत्तेवर आणते. त्यात कसूर होताच तेथील सत्ताधारी रसातळाला जातात हा इतिहास आहे.
तेंव्हा अशा एकमेकांना अजिबात पूरक नसलेल्या विचार सरणीच्या पक्षांनी एकत्र येऊन कितीही सोवळेपणाचा आव आणला तरी भारतीय जनता त्यांच्या ढोंगाला बळी पडणार नाही.
भारतीय जनतेने स्वीकृती द्यावी अशी करणी करावी लागेल. भ्रष्ट नेत्यांची हकालपट्टी करून स्वच्छ चारित्र्याचे नेते निवडावे लागतील, अथकपणे समाजकार्य करून जनमानसात पत निर्माण करावी लागेल तेंव्हाच इतर पक्षांनी आपल्या साठी उज्वल भविष्याचा विचार करावा. अन्यथा २०२४ च्या निवडणुका नंतर अनेकांना मूठमाती मिळणार आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे.
रविंद्र सरदेशमुख 

Wednesday, 12 July 2023

संस्कार यज्ञ

धरतीच्या उत्थानापासून मानवी उत्क्रांतीच्या निरनिराळ्या दशा इतिहासाने नमूद करून ठेवल्या आहेत. स्थित्यंतरे हे मनुष्य प्राण्याला लाभलेले एक वरदानच म्हणावे लागेल. माणूस प्राण्या इतकी विविधता इतर कोणत्याही जीवांना प्राप्त झालेली आजतागायत कुठे नोंदल्या गेलेली नाही. वंश, परंपरा, समूह, विधीभिन्नता, भाषा, आचरण, पोशाख, दिनचर्या अशा अनेक कारणांमुळे माणसं भिन्नतेने नटलेली आहेत. हे कदाचित थोडे की काय म्हणून पृथ्वी वरील प्रत्येक माणूस आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात आणि ते टिकवण्यासाठी रात्रंदिवस धडपडत असतो.
आश्चर्याची बाब अशी की इतकं सगळं विचित्र असूनही माणूस प्राणी जगभरातील निरनिराळ्या मानवी समूहांशी निगडित आहे. पृथ्वीच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला बिनदिक्कतपणे प्रवास करणारा केवळ माणूस एकमेव प्राणी आहे. आपल्या ह्या अतार्किक कौशल्यामुळे माणसाला विकासाच्या आणि विरुद्धार्थी विनाशाच्या अनेक संकल्पना निर्माण करता आल्यात आणि त्या सगळ्यांवर पुन्हा नियंत्रण देखील ठेवता आले आहे. मानवी बुद्धीच्या ह्या असामान्यत्वाचा मूळ पाया म्हणजे "संस्कार".
आधुनिक जगात "प्लॅन-परफेक्ट-परफॉर्म" अशी त्रिसूत्री अपरिहार्य ठरली आहे. स्पर्धा टोकाची ठरली असताना शतप्रतिशत यश ही उत्कर्षाची गुरुकिल्ली आहे. त्या साठी रोज निरनिराळ्या क्षेत्रात हजारो अनुसंधानकर्ते कार्यरत आहेत. प्रकल्पाची व्याप्ती कितीही असू देत, त्या मागे नियोजन अपरिहार्य झाले आहे आणि अशा नियोजनासाठी " रिसर्च अँड डेव्हलपमेंट" किंवा आर ऍन्ड डी असा वाक्प्रचार प्राथमिकतेचा विषय झाला आहे.
मित्रांनो, हा जो आर ऍन्ड डी चा प्रकार आहे त्यालाच वेदकालीन भाषेमध्ये 'संस्कार' असे संबोधले गेले आहे. हे संस्कार करीत असताना त्यातून एकाहून अधिक बाबींची निष्पत्ती होणे स्वाभाविक आहे आणि त्या अर्थाने पुन्हा पुन्हा संशोधन करीत राहणे ही पुढील अवस्था आहे. 
मी ह्या लेखाचे शीर्षक "संस्कार यज्ञ" असे देण्यामागील गर्भितार्थ हाच आहे की मानव जातीला परमोत्कर्षाच्या अवस्थेची प्राप्ती करण्यासाठी अखंडितपणे संस्कार यज्ञामध्ये प्रयत्नांची आहुती देतच रहावी लागणार आहे. 
ब्रह्मांडाच्या सकल ज्ञानाची महिती माणूस मिळविणार नाही तोपर्यंत हा संस्कार यज्ञ असाच तेवत राहणार आहे.
कवि 'रवि'
रविंद्र सरदेशमुख 

Tuesday, 11 July 2023

रस माधुर्य

एक प्याला पूर्ण भरला
अमृताने की सुधेने
संगती जैसी जयाची
त्यास प्राप्ती हो तयाची

आत्मक्लेशाने दरिद्री
राहिला जरी कां धनी तो
नाम संकीर्तनात रमला
सर्व सुख साधी मनीं तो

काम क्रोध लोभ मोह सारी
ईश्वराची निर्मिती
राहिला पुरुनी तयांसी
मानवी तो संत होतो

काय हे सुख अल्प आहे
जन्म दिधला माणसाचा
 मुक्तीचा सोपान हा 'रवि'
मोक्ष ही बघ प्राप्त होतो

कवि 'रवि'

Monday, 3 July 2023

ये कैसा हुनर

ये कैसा हुनर 
मेरे दोस्त आज़माते है
बात हया की करते हैं
हमाम में नंगे नहाते हैं

दिल दिमाग को
क़फ़स में डाले रख कर
कशीदे उनके तारीफ में
पढ़ने अक़्सर चले जाते हैं

फना हो गई सारी दुनिया
रूबरू एक नया तोहफा आया
तब की टोपी अब का बुखार
यकायक इमान बदल जाते हैं

बात अब वो कहां है 'रवि'
मंज़र इन्कलाबी नज़र आते थे
फरिश्ते आजकल यहां वहां
जी हुजूरी में लगे दिखाई देते हैं
कवि 'रवि'